Join us

जेव्हा कर्णधार कोहली यशाचे श्रेय धोनीला देतो तेव्हा, पाहा हा व्हिडीओ

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 21:47 IST

Open in App

बंगळुरु, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनीचा अनुभव संघासाठी फार महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यातही या गोष्टीचा प्रत्यय आला. भारताला या सामन्यात यश मिळाल्यावर कर्णधार कोहलीने आनंद साजरा केलाच, पण हा आनंद साजरा करताना कोहलीने यशाचे श्रेय धोनीला दिले आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कोहली धोनीकडे बोट दाखवून यश साजरे करत असल्याचे दिसत आहे.

हा पाहा खास व्हिडीओ

बुढ्ढा होगा तेरा... महेंद्रसिंग धोनी किती फिट आहे ते पाहाभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता म्हातारा झाला, अशी टीका काही जणांनी केली होती. पण धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात या टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे. धोनीने या सामन्यात आपली विकेट वाचवण्यासाठी तब्बल 2.14 मी. आपले पाय स्ट्रेच केल्याचे पाहायला मिळाले.

धोनीचा षटकारांचा असा हा योगायोगभारताचा माजी कर्णधार आणि बेस्ट फिनिशर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये षटकारांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात रिषभ पंत बाद झाला आणि धोनी फलंदाजीला आला. या सामन्यात सहाव्या चेंडूवर धोनीने षटकार लगावला.

या सामन्यात धोनीच्या षटकारांचा अजब योगायोग पाहायला मिळाला. धोनीचा ट्वेन्टी-20 क्रिकेटमधील हा 50वा षटकार ठरला, तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 350वा सिक्सर ठरला. तेराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनीने मिडविकेटला षटकार लगावला.

टॅग्स :विराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया