Join us

खेळापेक्षा कोणीही मोठे नाही, खेळच सर्वोच्च : क्रीडामंत्री अनुराग ठाकूर

गेल्या काही काळापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद सुरु असल्याच्या वृत्ताने भारतीय क्रिकेटमधील दिग्गज भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 13:22 IST

Open in App

नवी दिल्ली : गेल्या काही काळापासून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद सुरु असल्याच्या वृत्ताने भारतीय क्रिकेटमधील दिग्गज भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली होती. दोन्ही खेळाडूंमधील मतभेद तीव्र झाल्याचे अनेक गोष्टींमधून पुढे आले. आता या वादात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी सूचक वक्तव्य केले आहे.ते म्हणाले की, ‘खेळापेक्षा मोठा कुणीही नाही. खेळच सर्वोच्च आहे. कोणत्या खेळाडूंमध्ये काय सुरू आहे, याबाबत मी सांगू शकत नाही. ती संबंधित संघटनेची जबाबदारी असते. त्यांनी याबाबत माहिती द्यावी, हेच योग्य ठरेल.’जेव्हापासून कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले, तेव्हापासून वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर आधी घोषणा केल्याप्रमाणे कोहलीने कर्णधारपद सोडले. मात्र बीसीसीआयने द. आफ्रिका दौऱ्यासाठी कोहलीला कर्णधार आणि रोहितला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले. 

टॅग्स :अनुराग ठाकुरविराट कोहलीरोहित शर्मा
Open in App