Join us

या दिग्गज खेळाडूच्या संघात एकही भारतीय क्रिकेटपटूला स्थान नाही

लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवर डोनाल्डने आपला संघ जाहीर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 18:40 IST

Open in App
ठळक मुद्देया निर्णयामुळे तो भारतीय चाहत्यांच्या टीकेचा धनी ठरत आहे.

नवी दिल्ली : भारताने आतापर्यंत बरेच महान फलंदाज क्रिकेट जगताला दिले. पण एका माजी महान गोलंदाजाने आपल्या आवडीचा संघ जाहीर करताना एकाही भारताच्या क्रिकेटपटूला स्थान दिलेले नाही. त्याच्या या निर्णयामुळे तो भारतीय चाहत्यांच्या टीकेचा धनी ठरत आहे.

https://youtu.be/cri-3i0_ZVI

दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्डने आपल्या संघाची निवड केली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडच्या अधिकृत यु ट्यूब चॅनेलवर डोनाल्डने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात त्याने ब्रायन लारा, सर व्हिव्ह रीचर्ड्स, माल्कम मार्शल आणि कर्टली अॅम्ब्रोज या वेस्ट इंडिजच्या महान खेळाडूंना स्थान दिले आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्न, अॅडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, ग्लेन मॅग्रा आणि जस्टिन लँगर यांचा समावेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेचे दोन फलंदाज या संघात आहे, यामध्ये जॅक कॅलिस आणि ए बी डी'व्हिलियर्स यांना स्थान दिले आहे.

टॅग्स :क्रिकेटएबी डिव्हिलियर्स