Join us  

IPL 2021पूर्वी समोर आली धक्कादायक बाब; CSK म्हणते रवींद्र जडेजा खेळणार की नाही याबाबत अनभिज्ञ!

No idea over Ravindra Jadeja's return: मागील काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 2:45 PM

Open in App

मागील काही महिन्यांपासून टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागला आहे. त्यातील काही खेळाडू सावरून पुन्हा मैदानावर उतरले आहेत, परंतु अजूनही काही खेळाडू राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) पुनर्वसनासाठी दाखल झाले आहेत. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यालाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापत झाली होती आणि तो तंदुरुस्तीसाठी कठोर मेहनत घेत आहे. त्यानं काही व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पण, तो कमबॅक कधी करेल, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) आगामी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2021) तो खेळणार की नाही, याबाबत अनभिज्ञ असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांना शिव्या देणारा गोलंदाज दुसऱ्या वन डेत इंग्लंडकडून खेळणार   CSK चे सीईओ कासी विश्वनाथन (  CSK CEO Kasi Viswanathan) यांनी सांगितले की, रवींद्र जडेजाआयपीएलच्या १४व्या पर्वात खेळेल की नाही, याबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतून परतला नाही. तो CSKच्या ताफ्यात कधी सहभागी होईल, याची कल्पना नाही.   Fact Check : भारत-पाकिस्तान यांच्यात २०२१मध्ये ट्वेंटी-20 मालिका होणार; दशकानंतर एकमेकांना भिडणार

CSKच्या कॅम्पमध्ये सध्या महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू आणि अन्य काही खेळाडू दाखल झाले आहेत. चेन्नईचे पहिले पाच सामने मुंबईत होणार आहेत, त्यामुळे आता खेळाडू मुंबईत दाखल होत आहेत. '' स्टीफन फ्लेमिंग आणि चेतेश्वर पुजारा मुंबईत दाखल झाले आहेत. २७-२८ मार्चला मुंबईत आमच्या कॅम्पला सुरुवात होईल,''असेही विश्वनाथन यांनी सांगितले.

चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) - रिटेन खेळाडू : एमएस धोनी, सुरेश रैना, केएम आसिफ, इमरान ताहिर, कर्ण शर्मा, मिशेल सैंटनर, आर. साई किशोर, लुंगी एनगिडी, रवींद्र जडेजा, नारायण जगदीशन, ऋतुराज गायकवाड़, जोश हेजलवुड, अंबाती रायडू, दीपक चाहर, फाफ डु प्लेसिस, शार्दूल ठाकुर, ड्वेन ब्राव्हो आणि सॅम कुरेन  

लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- मोईन अली ( Moeen Ali) ७ कोटी, के गौतम ( K Gowtham) ९.२५ कोटी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujra) ५० लाख, हरिशंकर रेड्डी ( Harishankar Reddy) २० लाख, भगत वर्मा ( Bhagath Varma) २० लाख, हरि निशांत (Hari Nishanth) २० लाख.

टॅग्स :आयपीएलचेन्नई सुपर किंग्सरवींद्र जडेजा