विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांना शिव्या देणारा गोलंदाज दुसऱ्या वन डेत इंग्लंडकडून खेळणार

India vs England, 2nd ODI : मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडचा संघ दुसऱ्या वन डे सामन्यात अंतिम ११मध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे.

India vs England, 2nd ODI : टीम इंडियानं पहिल्या वन डेत विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका वाचवण्यासाठी इंग्लंडचा संघ दुसऱ्या वन डे सामन्यात अंतिम ११मध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. २४ वर्षीय मॅट पार्किसन ( Matt Parkinson) याला फिरकीपटू आदिल राशिद याच्या जागी अंतिम ११मध्ये स्थान मिळू शकते.

गतवर्षी त्यानं गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि २०१९मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे वन डे व ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं. पार्किसन याला भारताविरुद्धच्या १४ सदस्यीय संघात इंग्लंडनं संधी दिल्यापासून तो चर्चेत आहे. याच पार्किसनचे जुने ट्विट व्हायरल होत आहे.

पार्किसननं काही वर्षांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) यांना शिव्या घातल्या होत्या आणि त्याचे ते ट्विट व्हायरल होत आहेत. त्यानं कोहली-धोनी यांचा अपमान केला होता. त्यानं रवींद्र जडेजाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्रिशतकी खेळीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता.

पार्किसननं त्याच्या ट्विटमध्ये विराटला गर्विष्ठ म्हटले होते आणि भारतीय कर्णधाराचा राग येतो, असंही त्यानं लिहीलं होतं. त्यात भारताचा माजी कर्णधार धोनी व विराट यांना तो कलंकीत म्हणाला होता.

पार्किसननं दोन वन डे सामन्यात एकही विकेट घेतली नाही, तर दोन ट्वेंटी-२० सामन्यांत त्याच्या नावावर पाच विकेट्स आहेत. त्यानं २७ लिस्ट ए क्रिकेटमध्ये ४२ व ४९ ट्वेंटी-२० सामन्यांत ८० विकेट्स घेतल्या आहेत.