Join us  

"गेल्या १३ वर्षांपासून खेळतोय, प्रथमच सलग दोन शतके झळकावता आल्याने खूश; बाद होण्याची भीती नाही"

 मोठी धावसंख्या उभारली जात नसतानाही चेंडू बॅटच्या मध्ये लागत होता, पण २० धावांच्या खेळीचे रुपांतर अर्धशतकामध्ये करण्यात अपयशी ठरत होतो. प्रत्येक लढतीमध्ये मात्र आत्मविश्वास उंचावलेला असायचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 5:42 AM

Open in App

दुबई : फार्मात असलेला दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज शिखर धवनने सलग दोन शतके झळकावली. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलच्या  इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्या व्यतिरिक्त यंदाच्या मोसमात दोन अर्धशतकेही झळकावत १३ वे पर्व संस्मरणीय ठरविले आहे. मंगळवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध पाच गड्यांनी पराभव स्वीकारणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सतर्फे त्याने १०६ धावांची खेळी केली. याबाबत बोलताना धवन म्हणाला, ‌‌‌“मी १३ वर्षांपासून खेळत आहे. प्रथमच सलग दोन शतके झळकावता आल्यामुळे खूश आहे. मी सकारात्मक मानसिकता राखून खेळतो. केवळ धावा फटकावण्याचा प्रयत्न करीत आहे. गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत  मिळत आहे किंवा नाही याचा विचार करीत नाही. मला बाद होण्याची भीती नाही. धवन पुढे म्हणाला,‘रिकाम्या वेळेत शारीरिक व मानसिक कणखरतेवर भर देण्याचा लाभ झाला. पळताना माझा वेग वाढला असून मला फिट भासत आहे.

धवनची स्पर्धेतील सुरुवात निराशाजनक झाली होती - मोठी धावसंख्या उभारली जात नसतानाही चेंडू बॅटच्या मध्ये लागत होता, पण २० धावांच्या खेळीचे रुपांतर अर्धशतकामध्ये करण्यात अपयशी ठरत होतो. प्रत्येक लढतीमध्ये मात्र आत्मविश्वास उंचावलेला असायचा. 

टॅग्स :शिखर धवनभारतIPL 2020