Join us  

महाराष्ट्राला बीसीसीआयच्या वार्षिक सभेत नो एंट्री; अधिकाऱ्यांची मनमानी

महाराष्ट्राला २३ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या सभेमध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे,

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 8:04 PM

Open in App

कोलकाता : तीन राज्य संघटनांना बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) सहभागी होण्यापासून रोखण्याचा प्रशासकांच्या समितीच्या (सीओए) निर्णयावर प्रश्न उपस्थितीत करून हा निर्णय पूर्णपणे मनमानी करणारा व चुकीचा आहे, असे मत बीसीसीआचे माजी मुख्य कायदे सल्लागार उषानाथ बॅनर्जी यांनी व्यक्त केले. सीओएने बुधवारी तामिळनाडू क्रिकेट संघटना (टीएनसीए), महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आणि हरियाणा क्रिकेट संघटना (एचसीए) यांना घटनेमध्ये बदल न केल्यामुळे २३ ऑक्टोबरला मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या एजीममध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे.

बॅनर्जी यांनी म्हटले आहे की, जर कुठल्या राज्य संघटनेने घटनेत बदल केला नसेल तर त्यांना पहिल्या वर्षी आर्थिक अनुदान व अन्य लाभांपासून वंचित करता येऊ शकते, पण एजीएममध्ये सहभागी होण्यापासून रोखता येणार नाही. एकदा जर राज्य संघटना पूर्ण सदस्य म्हणून मान्यता प्राप्त करीत असेल तर एजीएममध्ये सहभागी होणे आणि मतदान करणे त्यांचा कायदेशीर अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार व्यक्तींचा समूह तोपर्यंत परत घेऊ शकत नाही जोपर्यंत मनमानी आणि नियमबाह्य असेल. बीसीसीआयची आमसभाही त्यांना रोखू शकत नाही.’

टॅग्स :बीसीसीआयमहाराष्ट्र