Australia vs India, 3rd ODI : भारतीय वनडे संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलच्या पदरी नाणेफेकीवेळी निराशा आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिडनीच्या मैदानात गिलनं सलग तिसरा तर भारतीय संघाने वनडेत सलग १८ व्या वेळी नाणेफेकीचा कौल गमावल्याचे पाहायला मिळाले. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील न्यूझीलंडविरुद्ध्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने वनडेत अखेरचा टॉस जिंकला होता. सिडनी वनडेत ऑस्ट्रेलियन मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करुन टीम इंडियासमोर टार्गेट सेट करण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय संघाला धक्का, दोन बदलासह मैदानात उतरली टीम इंडिया
ऑस्ट्रेलिया विरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका आधीच गमावलेल्या टीम इंडियाला तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात मोठा धक्का बसला आहे. युवा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे संघातून आउट झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, डाव्या मांडीच्या पुढच्या स्नायूला दुखापत झाल्यामुळे (Left Quadriceps Injury) त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले असून तो बीसीसीआयची मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहे. व्हाइट वॉशची नामुष्की टाळण्यासाठी टीम इंडियाने या सामन्यात प्रमुख फिरकीपटू कुलदीप यादवला संघात घेतलं असून अर्शदीप सिंगच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली आहे.
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
टीम इंडियाच्या नावे नकोसा वर्ल्ड रेकॉर्ड; वनडेत सलग १८ व्या वेळी गमावला टॉस
| संघ | सलग हरलेले टॉस | कधी पासून | कधी पर्यंत |
|---|
| भारत | १८* | १९ नोव्हेंबर २०२३ | २३ ऑक्टोबर २०२५ |
| नेदरलँड्स | ११ | १८ मार्च २०११ | २७ ऑगस्ट २०१३ |
| इंग्लंड | ९ | २७ जानेवारी २०२३ | १३ सप्टेंबर २०२३ |
| अमेरिका (USA) | ९ | २९ मे २०२२ | १३ ऑगस्ट २०२२ |
| इंग्लंड | ९ | २२ जानेवारी २०१७ | २९ मे २०१७ |
| वेस्ट इंडिज | ९ | १३ ऑक्टोबर २०११ | १६ मार्च २०१२ |
| ऑस्ट्रेलिया | ९ | ०६ नोव्हेंबर १९९८ | २४ जानेवारी १९९९ |
रोहित शर्मा टीम इंडियाकडून सलग सर्वाधिक टॉस गमावणारा भारतीय कर्णधार, इथं पाहा रेकॉर्ड
भारताकडून वनडेत सर्वाधिक टॉस गमावण्याचा नकोसा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने सलग १२ वेळा टॉस गमावला आहे. ब्रायन लारासह सलग सर्वाधिक टॉस गमावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो टॉपला आहे. शुबमन गिलनं वनडे सलग तिसऱ्यांदा टॉस गमावला. आतापर्यंत कसोटी आणि वनडेत १० पैकी फक्त एका सामन्यात त्याने टॉस जिंकला आहे. दिल्लीच्या कसोटीत वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने एकमेव टॉस जिंकला आहे.
| कर्णधार | सलग हरलेले टॉस | कधी पासून | कधी पर्यंत |
|---|
| रोहित शर्मा | १२ | १९ नोव्हेंबर २०२३ | ९ मार्च २०२५ |
| ब्रायन लारा | १२ | ३१ ऑक्टोबर १९९८ | २१ मे १९९९ |
| पीटर बोरेन | ११ | १८ मार्च २०११ | २७ ऑगस्ट २०१३ |
| जोस बटलर | ९ | २७ जानेवारी २०२३ | १३ सप्टेंबर २०२३ |
| मोनांक पटेल | ९ | २९ मे २०२२ | १३ ऑगस्ट २०२२ |
| इऑन मॉर्गन | ९ | २२ जानेवारी २०१७ | २९ मे २०१७ |
| नासर हुसेन | ९ | २४ ऑक्टोबर २००० | २२ जानेवारी २००२ |