Join us

IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

रेड्डीचा अप्रतिम चेंडू अन् गलीत जैस्वालचा 'यशस्वी' झेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 18:08 IST

Open in App

Nitish Kumar Reddy Gives Fiery Send Off After Yashasvi Jaiswal Take Catch Of Zak Crawley At Lord's : लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने सामन्यात मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्या सत्रातील खेळात मोहम्मद सिराजनं इंग्लंडला दोन धक्के दिल्यावर नितीश कुमार रेड्डी पिक्चरमध्ये आला. त्याने पुन्हा एकदा इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉउली याला आपल्या अप्रतिम आउट स्विंगवर चकवा दिला. या सामन्यात सलग दुसऱ्यांदा रेड्डीनं इंग्लंडच्या सलामीवीराला तंबूचा रस्ता दाखवला. या विकेटमधील सर्वात खास गोष्ट ही की,  गलीत जैस्वालनं गोधंळ न घालता  'यशस्वी' कॅचसह इंग्लंडचा तिसरा धक्का देण्यात मोलाचा वाटा उचलला. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

रेड्डीचा अप्रतिम चेंडू अन् गलीत जैस्वालचा 'यशस्वी' झेल

चौथ्या दिवसाच्या खेळातील १५ व्या षटकात नितीश कुमार रेड्डीनं ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथवर टाकलेला चेंडू मारताना क्रॉउली  फसला. क्राउलीच्या बॅटची कड घेऊन चेंडू पहिल्या कसोटी सामन्यात जिथं उभा राहिल तिथं झेल सोडणाऱ्या यशस्वी जैस्वालच्या दिशेनं गेला. पण यावेळी जैस्वालनं कोणताही गोंधळ न घालता उजव्या बाजूला डाइव्ह मारत 'यशस्वी'रित्या झेल पकडला अन् इंग्लंडच्या संघाला ५० धावांवर तिसरा धक्का बसला. यशस्वी जैस्वालचा इंग्लंड दौऱ्यातील सामन्यातील हा पहिला कॅच आहे. याआधी कॅच सोडून त्याने नकोसा विक्रम आपल्या नावे केला होता.  स्लिप अन् गलीतून  बाहेर उभे केल्यावरही त्याने कॅच सोडल्याचे पाहायला मिळाले. अखेर गलीत त्याच्या मागे लागलेली साडेसाती क्रॉउलीच्या कॅचसह संपलीये. हा कॅचमुळे निश्चितच त्याचा आत्मविश्वास वाढेल.  

IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)

पहिल्या डावातही रेड्डीच्या जाळ्यात फसला होता क्रॉउली

नितीश कुमार रेड्डीने दुसऱ्यांदा क्रॉउलीची शिकार केल्यावर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात रेड्डीनं इंग्लंडच्या सलामीवीराला १८ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला होता. दुसऱ्या डावात एक ६ चेंडू अधिक खेळत क्रॉउली ४९ चेंडूत तीन चौकारांसह २२ धावा करून तंबूत परतला.

नितीश रेड्डीनं बॅटिंगसह बॉलिंगमध्ये दाखवली धमक

लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्याच्या संघाने पहिल्या डावात ३८७ धावा केल्यावर भारतीय संघानेही पहिल्या डावात तेवढ्याच धावा केल्या. परिणामी तिसऱ्या दिवसाअखेर दोन्ही संघ सामन्यात बरोबरीत होते. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाने कमालीची गोलंदाजी करत इंग्लंडच्या संघाला बॅकफूटवर ढकलले असून सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकला आहे. नितीश कुमार रेड्डीनं पहिल्या डावात दोन विकेट्स घेतल्यावर फलंदाजीत ३० उपयुक्त धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात पुन्हा त्याने आपल्या गोलंदाजीतील धमक दाखवली आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडयशस्वी जैस्वाल