Join us

के. एल राहुल या अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड? 

मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 08:10 IST

Open in App

नवी दिल्ली - मैदानावर अक्षरश: धावांचा धुमाकूळ घालणारा भारताचा आक्रमक फलंदाज के. एल राहुल अभिनेत्रीच्या प्रेमात क्लीन बोल्ड झाला आहे. केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री निधी अग्रवाल एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. 

क्रिकेट आणि बॉलिवूड क्षेत्रातील सेलिब्रिटी एकत्र येऊन अनेक जोड्या बनल्या आहेत. यात आता राहुल आणि निधी अग्रवालचा समावेश झाला आहे. केएल राहुल - निधी अग्रवाल यांच्या  नुकत्याच समोर आलेल्या फोटोंमुळे या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे. डेटवर गेलेले दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

या आयपीएलच्या सत्रामध्ये केएल राहुलनेही किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे निधी अग्रवाल  काही दिवसांपूर्वीच मुन्ना मायकल या सिनेमात  दिसली होती. मात्र या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कमाल करता आली नाही. मात्र या चित्रपटाने निधी अग्रवालला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. बंगळुरुची असणाऱ्या निधीने मॉडेलिंग केले असून मिस दिवा 2014 ची स्पर्धक होती.

यंदाच्या लीगमध्ये सर्वाधिक स्फोटक सलामीवीर म्हणून राहुलने छाप पाडली. त्याचप्रमाणे तो सर्वात स्टायलिशही ठरला. स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रामध्ये त्याने एकट्याच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या प्लेआॅफ गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. क्षेत्ररक्षक आणि यष्टिरक्षक म्हणून तो लक्षवेधी ठरला.

टॅग्स :लोकेश राहुलआयपीएल 2018