Join us

Nidahas Trophy 2018 : रोहित शर्माचा नवा रेकॉर्ड, युवराज सिंगलाही टाकलं मागे

एकदिवसीय सामन्यांमध्ये तीनदा द्विशतक लगावण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या रोहित शर्माने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 12:27 IST

Open in App

कोलंबो- एकदिवसीय सामन्यांमध्ये तीनदा द्विशतक लगावण्याचा विश्वविक्रम करणाऱ्या रोहित शर्माने पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. टी-20मध्ये युवराज सिंगचा 74 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडणार रोहित शर्मा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. 

निदाहास ट्रॉफी टी-20मध्ये बांग्लादेशविरोधात खेळल्या गेलेल्या सामन्यात पूर्ण 20 ओव्हरपर्यंत रोहित मैदानात होता. याआधी हा रेकॉर्ड गौतम गंभीरच्या नावे होता. 2012मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधातील टी-20 सामन्यात गौतम गंभीर 19.4 ओव्हरपर्यंत मैदानात होता. रोहित शर्माने 89 धावांच्या खेळीमध्ये पाचवा सिक्स लगावत युवराज सिंगचा 74 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडला. 

सगळ्यात जास्त सिक्सर्स लगावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत रोहित आता पहिल्या क्रमाकांवर आहे. रोहितने एकुण 75 सिक्सर्स लगावले आहेत. त्यानंतर युवराज सिंग (74), सुरेश रैना (54), धोनी (46) आणि विराट कोहली (41) चा नंबर लागतो. एका वर्षात सर्वात जास्त सिक्सर्स लगावण्याचा रेकॉर्डही रोहित शर्माच्या नावे आहे. रोहित शर्माने 2017मध्ये तिन्ही प्रकारच्या सामन्यात 65 सिक्सर्स लगावण्याचा रेकॉर्ड केला होता. त्यावेळी त्याने क्रिस गेलचा 64 सिक्सर्सचा रेकॉर्ड तोडला. 

दरम्यान, कर्णधार रोहित शर्माचे (८९) आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर युवा फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (३/२२) याने घेतलेली फिरकी याजोरावर भारताने टी२० तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारताना बांगलादेशचा १७ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या १७६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने २० षटकात ६ बाद १५९ धावा केल्या. मुशफिकुर रहिमने (७२*) पुन्हा एकदा शानदार अर्धशतक झळकावले, परंतु संघाला विजयी करण्यात तो अपयशी ठरला. रोहित शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

टॅग्स :निदाहास ट्रॉफी २०१८रोहित शर्माक्रिकेट