माऊंट मेंगनुई - न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडच्या जेम्स नीशमने तुफान फटकेबाजी केली. नीशमची फटकेबाजी अन् मार्टीन गप्टीलच्या धुव्वादार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेसमोर 50 षटकात 372 धावांचे विराट लक्ष्य उभारले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 गड्यांच्या मोबदल्यात 371 धावांची तुफानी खेळी केली. नीशमने 13 चेंडूत 47 धावा कुटत धावांची आतषबाजी केली.
प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांनी अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. कर्णधानर केन विल्यमसने 76 धावांची संयमी खेळी केली. तर, विल्यमसनला रॉस टेलरनेही 54 धावांचा अर्धशतकी खेळ करत उत्तम साथ दिली. तत्पूर्वी धडाकेबाज फलंदाज मार्टीन गप्टीलच्या शतकी खेळीमुळे न्यूझीलंडने धावांचा डोंगरच उभारला होता. गप्टीलने 5 षटकार आणि 11 चौकारांच्या सहाय्याने 139 चेंडूत 138 धावा कुटल्या. त्यामुळे न्यूझीलंडला श्रीलंकेसमोर 372 धावांचे लक्ष्य ठेवता आले.
न्यूझीलंडकडून शेवटच्या 4 षटकांत फलंदाजी करताना जेम्स नीशमने तुफानी खेळ केला. जेम्सने केवळ 13 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. या तुफानी नाबाद 47 धावांसह जेम्सने जलद धावांचे अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले. विशेष म्हणजे जेम्सने तिसारा परेराच्या एका षटकात तब्बल 34 धावा कुटल्या. यापूर्वीही कुठल्याही न्यूझीलंडच्या खेळाडूने एका षटकात एवढ्या धावा केल्या नाहीत. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जच्या नावावर आहे. गिब्जने 6 चेंडूत 6 षटकार ठोकत एका षटकात 36 धावा केल्या होत्या. सन 2007 मध्ये नेदरलँडच्या डी. वॉन बंगच्या गोलंदीजीवर गिब्जने ही सुमार फटकेबाजी केली होती.
1 षटकात सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज
36 रन- हर्शल गिब्स vs वॉन बंग, सेंट किट्स, 2007
35 रन- तिसारा परेरा vs रॉबिन पीटरसन, पल्लेकेले, 2013
34 रन- एबी डिविलियर्स vs जेसन होल्डर, सिडनी, 2015
34 रन- जेम्स नीशम vs तिसारा परेरा, माउंट मैंगनुई, 2018 *
तसेच जेम्स नीशमने 13 चेंडूत 47 धावा करताना 361.53 च्या स्ट्राईक रेटने खेळ केला. विशेष म्हणजे एकदिवसीय सामन्यात 9 चेंडूचा सामना करणाऱ्या फलंदाजांमध्ये हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट आहे.
एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक स्ट्राईक रेट (कमीत कमी 9 चेंडूचा खेळ)
361.53 - जेम्स नीशम v श्रीलंका, माउंट मैंगनुई, 2019* (13 गेंदों पर 47* रन)
355.55- नाथम मैकलम v श्रीलंका, हम्बनटोटा, 2013 (9 गेंदों पर 32* रन )
338.63-एबी डिविलियर्स v वेस्टइंडीज, जोहांसबर्ग, 2015 (44 गेंदों पर 149 रन)