Join us
Daily Top 2Weekly Top 5

झीवाच्या जन्माची बातमी साक्षीनं माहीच्या आधी दिली होती या क्रिकेटरला

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची मुलगी झीवाच्या जन्माची गोड बातमी पत्नी साक्षीनं सर्वात आधी धोनीला देण्याऐवजी या क्रिकेटरला दिली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 16:45 IST

Open in App

मुंबई -  टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीची मुलगी झीवाच्या जन्माची गोड बातमी पत्नी साक्षीनं सर्वात आधी धोनीला देण्याऐवजी सुरेश रैनाला दिली होती. तुम्हाला हे वृत्त वाचून आश्चर्याचा धक्का बसेल पण हेच खरं आहे. झीवाचा जन्म वर्ष 2015 तील आहे. ही त्यावेळची गोष्ट आहे, ज्यावेळी टीम इंडिया 2015 मध्ये वर्ल्डकप खेळण्यासाठी परदेश दौ-यावर होती.  

यादरम्यान, 6 जानेवारी 2015ला झीवाचा जन्म झाला. प्रॅक्टीस करताना कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी धोनीनं स्वतःकडे मोबाइल बाळगणं टाळलं होते. अशातच साक्षीला मुलीच्या जन्माची गुड न्यूज धोनीपर्यंत कशीही करुन पोहोचवायची होती. यासाठी तिनं धोनीचा मित्र सुरेश रैनाला त्यावेळी फोन केला आणि धोनीपर्यंत झीवाच्या जन्माची बातमी धोनीपर्यंत पोहोचवण्यास सांगितले.  

'Democracy’s XI: The Great Indian Cricket Story' या पुस्तकात हा खुलासा करण्यात आला आहे. पुस्तकात असे लिहिण्यात आले आहे की, वर्ल्डकप 2015साठीच्या प्रॅक्टीसदरम्यान धोनी स्वतःकडे मोबाइल ठेवत नसे. यामुळे त्याला मुलगी झीवाच्या जन्माची बातमी सुरेश रैनाकडून मिळाली होती. साक्षीनं सुरेश रैनाला फोन करुन ही गुड न्यूज सांगितली. यानंतर रैनानं धोनीला झीवाच्या जन्माची बातमी सांगितली. पुस्तकाचे प्रकाशकांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.  

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून धोनी आणि त्याची मुलगी झीवाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत. चाहतेदेखील मोठ्या प्रमाणात त्याचे व्हिडीओ-फोटोज शेअर करतात.   

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीक्रिकेट