मँचेस्टर कसोटी रद्द केल्याचा आला राग?, इंग्लंडच्या तीन मोठ्या खेळाडूंची आयपीएल २०२१मधून माघार!

भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाचे फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 04:50 PM2021-09-11T16:50:19+5:302021-09-11T16:53:19+5:30

whatsapp join usJoin us
NEWS ALERT: Dawid Malan (PBKS), Chris Woakes (DC), and Jonny Bairstow (SRH) have pulled out of IPL 2021 | मँचेस्टर कसोटी रद्द केल्याचा आला राग?, इंग्लंडच्या तीन मोठ्या खेळाडूंची आयपीएल २०२१मधून माघार!

मँचेस्टर कसोटी रद्द केल्याचा आला राग?, इंग्लंडच्या तीन मोठ्या खेळाडूंची आयपीएल २०२१मधून माघार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. भारतीय संघाचे फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेतला गेला. भारतीय संघानं या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. पण, कोरोना रुग्ण आढळल्यामुळे पाचवी कसोटी रद्द करावी लागली. आता भारतीय खेळाडू एकेक करून इंडियन प्रीमअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यासाठी ( IPL 2021) यूएईत दाखल होत आहेत. पण, भारतानं पाचवी कसोटी रद्द केल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू नाराज झाले आहेत आणि आता तर तीन खेळाडूंनी आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्यामुळे आयपीएल फ्रँचायझींना मोठा धक्का बसला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह फिजिओच्या संपर्कात आलेला रोहित शर्मा; समोर आले मोठे अपडेट्स

सनरायझर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर जॉनी बेअरस्टो, राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर आणि पंजाब किंग्सच्या डेवीड मलान यांनी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून माघार घेतली आहे. राजस्थानसाठी हा मोठा धक्का आहे, कारण आधीच त्यांचे जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स हे खेळाडू संघाबाहेर आहेत. ( According to reports, Jonny Bairstow, Chris Woakes and Dawid Malan have withdrawn from the second phase of IPL 2021.) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि अॅशेस मालिकेपूर्वी कुटुंबीयांना वेळ देता यावा यासाठी मलाननं आयपीएलमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागी एडन मार्कराम पंजाब किंग्सकडून खेळणार आहे.

 

दरम्यान, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर आणि चेतेश्वर पुजारा हे चेन्नई सुपर किंग्सचे सदस्य शनिवारी रात्री लंडन येथून दुबईसाठी रवाना होतील. त्यांच्यासोबत सॅम कुरन व मोईन अली हेही असतील.  दिल्ली कॅपिटल्सचे आर अश्विन, इशांत शर्मा, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत आणि अक्षर पटेल, तर पंजाब किंग्सचे लोकेश राहुल, मोहम्मद शम व मयांक अग्रवाल हे एमिरेट्स फ्लाइटनं दुबईसाठी रवाना होतील.  मुंबई इंडियन्सचे रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह व सूर्यकुमार यादव दुबईत दाखल झाले आहेत. 

Web Title: NEWS ALERT: Dawid Malan (PBKS), Chris Woakes (DC), and Jonny Bairstow (SRH) have pulled out of IPL 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.