Join us

ZIM vs NZ : न्यूझीलंडचा विश्व विक्रम! टीम इंडियासह असा पराक्रम करणारा ठरला तिसरा संघ

किवी संघाकडून तिघांनी केली मोठी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:06 IST

Open in App

New Zealand World Record Three Batters Getting Over 150 Runs :  झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने मोठा पराक्रम करून दाखवलाय. झिम्बाब्वेचा पहिला डाव १२५ धावांत आटोपल्यावर न्यूझीलंडच्या संघाने धावांचा डोंगर उभारला. डेवॉन कॉन्वे, हेन्री निकोल्स आणि रचिन रवींद्र यांनी १५० पेक्षा अधिक धावा केल्या. या तिघांच्या कामगिरीच्या  जोरावर न्यूझीलंडच्या संघाने भारत-इंग्लंड यांनी सेट केलेल्या विश्व विक्रमाची बरोबरी साधली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

किवी संघाकडून तिघांनी केली मोठी खेळी

झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत डेवॉन कॉन्वे याने २४५ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. ब्लेसिंग मुजारबानी याने त्याला तंबूचा रस्ता दाखवल्यावर हेन्री निकोल्स (१५० नाबाद) आणि रचिन रवींद्र (१६५ नाबाद) न्यूझीलंडच्या धावफलकावर ३ बाद ६०१ धावा केल्या. दुसऱ्या दिवसाअखेर किवी संघाने ४७६ धावांची मोठी आघाडी घेतली होती.   

क्रोएशियाच्या पोरानं रचला इतिहास; Zach Vukusic ठरला क्रिकेट जगतातील सर्वात युवा कर्णधार

कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तिसरा संघ 

कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात एका डावात तिघांनी १५० पेक्षा अधिक धावा करण्याची ही तिसरी वेळ ठरली. याआधी इंग्लंडच्या संघाने १९३८ मध्ये ओव्हलच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय टीम इंडियाने १९८६ मध्ये  ग्रीन पार्कच्या मैदानात हा डाव साधला होता. 

कसोटीत एका डावात ३ फलंदाजांनी १५० पेक्षा अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड

 

  • इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, लंडन, १९३८ 
  • भारत विरुद्ध श्रीलंका, ग्रीन पार्क, कानपूर, १९८६
  • न्यूझीलंड विरुद्ध झिम्बाब्वे, क्वींस स्पोर्ट्स क्लब, बुलावायो, २०२५

 

दुसऱ्या दिवसाच्या खेळात फक्त दोन विकेट्स

दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या संघाने १ बाद १७४ धावांवरून खेळाला सुरुवात केली. नाइट वॉचमनच्या रुपात आलेल्या जॅकब डफीला आउट करण्यासाठी झिम्बाब्वेनं एक तास घेतला. त्याने ३६ धावांची खेळी केली. कॉन्वेच्या रुपात न्यूझीलंडला आणखी एक धक्का बसला. पण त्यानंतर रचिन रवींद्र आणि हेन्रीन झिम्बाब्वेच्या गोलंदाजांचे खांदे पाडले.

 

टॅग्स :न्यूझीलंडझिम्बाब्वे