New Zealand Won By 61 Runs Sri Lanka Out Of Semi Final Race ICC T20 World Cup 2026 : कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील लढतीत न्यूझीलंडच्या संघाने यजमान श्रीलंकेला पराभूत केले आहे. या पराभवासह श्रीलंकेचा यंदाच्या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघाने अवघ्या ८४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. पण अखेरच्या ४७ चेंडूत कोल मॅककॉन्ची आणि कर्णधार मिचेल सँटनर यांनी केलेल्या ८४ धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडच्या संघाने श्रीलंकेसमोर १६८ धावा करत आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
आधी मॅट हेन्रीचा भेदक मारा; मग दिसली रचिन-मिचेलच्या फिरकीतील जादू
न्यूझीलंडच्या संघाने दिलेल्या १६९ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. दमदार फॉर्ममध्ये असलेल्या पथुम निसंका याला मॅट हेन्रीनं पहिल्याच चेंडूवर खातेही न उघडता तंबूता रस्ता दाखवला. एवढ्यावरच न थांबता हेन्रीनं त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या चरिथा असलंकालाही अवघ्या ५ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर मिचेल सँटनर आणि रचिन रविंद्र यांनी आपल्या फिरकीतील जादू दाखवून देत श्रीलंकेच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात आणल्या. न्यूझीलंडच्या संघाकडून कामिंदू मेंडिस ३१ (२३, दुनिथ वेल्लालागे २९(२३), पवन रत्ननायके १० (१८) आणि कुसल मेंडिस ११ (२२) यांच्याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. ज्यांनी दुहेरी आकडा गाठला ते मोठी खेळी करू शकले नाहीत. परिणामी 'करो वा मरो'च्या लढतीत लंकेचा संघ निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १०७ धावांपर्यतच मजल मारू शकला. न्यूझीलंडच्या संघाने ६१ धावांनी सामना जिंकत सेमीची आपली दावेदारी भक्कम केली आहे. न्यूझीलंडच्या संघाकडून गोलंदाजीत रचिन रविंद्र याने सर्वाधक ४ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. मॅट हेन्रीनं २ तर मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली.
NZ vs SL : सँटनर-मॅककॉन्ची जोडीची कमाल! विक्रमी भागीदारीसह श्रीलंकेसमोर उभारली आव्हानात्मक धावसंख्या
न्यूझीलंडच्या विजयासह पाकिस्तानचाही करेक्ट कार्यक्रम?
न्यूझीलंडच्या विजयासह पाकिस्तानच्या सेमीचा प्रवास अधिक खडतर झाला आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघाने स्वबळावर सेमीचं तिकीट मिळवण्यासह आपल्या गटातून अव्वलस्थानावर कब्जा करण्याच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. पाकिस्तानचा संघ २८ फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध सुपर ८ फेरतील आपला अखेरचा सामना खेळणार आहे. पण त्याआधी २७ फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकला तर पाकिस्तानचा संघ मैदानात उतरण्याआधी स्पर्धेतून बाद होईल. श्रीलंकेविरुद्ध चांगल्या धावगतीने विजय मिळवला ही देखील न्यूझीलंडसाठी जमेची बाजू ठरेल. त्यामुळेच पाकिस्तानचा संघ अजूनही सेमीच्या शर्यतीत असला तरी त्यांचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. एखादा चमत्कारच त्यांना वाचवू शकतो.
Web Summary : New Zealand defeated Sri Lanka by 61 runs, ending Sri Lanka's semi-final hopes. With this win, New Zealand strengthens its position, while Pakistan's chances of advancing become significantly more challenging. A New Zealand win against England will knock Pakistan out.
Web Summary : न्यूजीलैंड ने श्रीलंका को 61 रनों से हराया, जिससे श्रीलंका की सेमीफाइनल की उम्मीदें खत्म हो गईं। इस जीत के साथ, न्यूजीलैंड ने अपनी स्थिति मजबूत कर ली है, जबकि पाकिस्तान के आगे बढ़ने की संभावना काफी चुनौतीपूर्ण हो गई है। इंग्लैंड के खिलाफ न्यूजीलैंड की जीत पाकिस्तान को बाहर कर देगी।