New Zealand vs England, 1st Test : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात ग्लेन फिलिप्सनं हवेत झेपावत अफलातून कॅच घेत सर्वांचे लक्षवेधून घेतलं आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर हॅरी ब्रूक्स आणि ओली पोप यांनी १५०+ भागादारी करत इंग्लंडचा डाव सावरला. ही जोडी फोडणं न्यूझीलंडत्या गोलंदाजांसाठी खूपच मुश्किल झालं होतं. या परिस्थितीत संघाच्या मदतीला धावून आला तो ग्लेन फिलिप्स.
ग्लेन फिलिप्सचा सुपरमॅन अवतार; हवेत उडी मारुन पकडला अफलातून कॅच
इंग्लंडच्या डावातील ५२ व्या षटकात अनुभवी गोलंदाज टीम साउदी गोलंदाजीला आला. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर ओली पॉपनं एक सुंदर फटका खेळला. पण ग्लेन फिलिप्सच्या अफलातून क्षेत्ररक्षणासमोर पॉपचा शॉट फसवा निघाला. गल्लीत (Gully) क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या ग्लेन फिलिप्सनं हवेत उडी मारून अगदी सुपरमॅनच्या तोऱ्यात अफलातून कॅच घेतला. संघासाठी डोकेदुखी ठरत असलेली जोडी फोडण्याचं काम केलं. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलपैकी एक वाटावा असा आहे. यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम कॅच निवडताना ग्लेन फिलिप्सच्या या कॅचला पहिली पसंती मिळाली तर नवल वाटणार नाही, एवढा भारी कॅच त्याने पकडलाय.
इंग्लंडची सेट झालेली जोडी फोडण्यासाठी अनुभवी गोलंदाज टिम साउदी गोलंदाजीला आला. त्याच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर ओली पोपनं बॅकवर्ड पाइंटच्या दिशेनं मारलेला फटका कोणी रोखू शकेल, हा विचार करणंच चुकीच होते. कारण हा चेंडू १२५.९ kph वेगाने आला होता. पण ग्लेन फिलिप्सनं अशक्यप्राय वाटणारी गोष्ट करून दाखवत पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणातील उत्तम दर्जा दाखवून दिला. चेंडूचा वेग आणि हवेत झेपावत ग्लेन फिलिप्सनं एका हातात टिपलेला झेल क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम झेलपैकी एक ठरतो. न्यूझीलंडचा हा खेळाडू क्षेत्ररक्षणात सातत्याने क्लास कामगिरी करून दाखवताना दिसते. संघ अडचणीत सापडल्यावर तो बॅटिंगही करतो. पहिल्या डावात नाबाद अर्धशतकी खेळीनं त्याने तेही दाखवून दिले. वेळप्रसंगी पार्ट टाइम गोलंदाजाच्या रुपात सेट जोडी फोडण्यातही तो पटाईत आहे. यावेळी फिल्डिंगच्या जोरावर त्याने इंग्लंडची सेट जोडी फोडून संघाला मोठा हातभार लावला.