Join us  

विराट कोहलीप्रमाणे त्याचा नवा भिडू अम्पायरवर रागावला अन् ICCनं कारवाईचा बडगा उगारला

Kyle Jamieson fined for breaching ICC Code of Conduct टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अम्पायरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केलेलीही पाहायला मिळाली. त्यावरून इंग्लंडचे माजी खेळाडू डेव्हिड लॉयड ( Former England cricketer David Lloyd) यांनी टीम इंडियाच्या कर्णधारावर टीका केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 1:04 PM

Open in App

विराट अम्पायरवर दबाव टाकतो, त्यांच्या निर्णयाचा अनादर करतो आणि त्यांच्यासोबत वाद घातलो, असे आरोप इंग्लंडचे माजी खेळाडू डेव्हिड लॉयड यांनी केले. पण आता इंडियन प्रीमिअर लीगमधील ( IPL) विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघात नव्यानं दाखल झालेल्या कायले जेमिन्सन ( Kyle Jamieson) यानंही अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि ICCत्याला शिक्षा सुनावली. IPL 2021च्या लिलावात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघानं जलदगती गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेतले आहे. फक्त IPL नव्हे, तर टीम इंडियाच्या युवा खेळाडूंच्या यशामागे राहुल द्रविडची मेहनत; मायकेल वॉननं केलं कौतुक

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात कायले जेमिन्सननं अम्पायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ( नेमकं काय घडलं?: Video : सॉफ्ट सिग्नलचा विराट कोहलीच्या नव्या भिडूला फटका; अफलातून झेल घेऊनही अम्पायरनं दिलं NOT OUT!)  आयसीसीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला मॅच फीमधील १५% टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्यानं आयसीसीच्या कलम २.८ चे उल्लंघन केलं. त्याला एक नकारात्मक गुणही ( one demerit point ) मिळाला आहे आणि मागील २४ महिन्यांतील कालावधीत त्याचा हा दुसरा नकारात्मक गुण आहे. न्यूझीलंड - बांगलादेश ( New Zealand vs Banglandesh) यांच्यातल्या बांगलादेशच्या डावातील १५ व्या षटकात तमीम इक्बालचा झेल घेतल्यानंतरही तिसऱ्या अम्पायरनं नाबाद असा निर्णय दिला अन् जेमिन्सन भडकला. जेमिन्सननं चूक मान्य केली आणि आयसीसीची कारवाई मान्य केली.  पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

विराट कोहली अम्पायर्सवर दबाव टाकतो, त्यांचा अनादर करतो; इंग्लंडच्या दिग्गजाची टीका 

भारत-इंग्लंड यांच्यातल्या ( India vs England) यांच्यातल्या मालिकेत मैदानावरील अम्पायरच्या निर्णयावर अनेकदा वाद उठल्याचे दिसले. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं अम्पायरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केलेलीही पाहायला मिळाली. त्यावरून इंग्लंडचे माजी खेळाडू डेव्हिड लॉयड ( Former England cricketer David Lloyd) यांनी टीम इंडियाच्या कर्णधारावर टीका केली आहे.  विराट कोहलीची मागणी अनिल कुंबळेनं धुडकावली; टीम इंडियाच्या कॅप्टनला धक्का!

ट्वेंटी-२० मालिकेत विराटनं सॉफ्ट सिग्नल निर्णयावरून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सॉफ्ट सिग्नल निर्णयामुळे सूर्यकुमार यादव व वॉशिंग्टन सुंदर यांना बाद होऊन माघारी जावं लागलं होतं. लॉडय म्हणाले,''चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात डेवीड मलान यानं घेतलेल्या कॅचवरून वाद झाला. तेव्हा कोहली सॉफ्ट सिग्नलवरून मैदानावरील अम्पायरवर दबाव टाकत होता. इंग्लंडनं मैदानावरील अम्पायरव नितीन मेनन यांच्यावर दबाव टाकला की नाही, याबाबत मला माहित नाही. पण, कोहली या संपूर्ण मालिकेत अम्पायरवर दबाव टाकत आलाय, त्यांच्या निर्णयाचा अनादर करत आलाय.'' जबरा फॅन...!; टीम इंडियाला चिअर करण्यासाठी 'तो' चक्क टेकडीवर जाऊन बसला अन्...

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीन्यूझीलंडबांगलादेशआयसीसीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर