Join us  

न्यूझीलंड अ संघाने मारली बाजी

भारतीय अ संघातील आघाडीच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीनंतरही अपयश आल्याने न्यूझीलंडन अ संघाने दुसऱ्या आनौपचारिक एकदिवसीय सामन्यात २९ धावांनी विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 4:24 AM

Open in App

ख्राईस्टचर्च : भारतीय अ संघातील आघाडीच्या फलंदाजांना चांगल्या सुरुवातीनंतरही अपयश आल्याने न्यूझीलंडन अ संघाने दुसऱ्या आनौपचारिक एकदिवसीय सामन्यात २९ धावांनी विजय मिळवला. यासह यजमानांनी तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.न्यूझीलंड अ संघाने ५० षटकात ७ बाद २९५ धावा केल्या. सलामीवीर जॉर्ज वर्करने १३५ व कोल मैकोंचीने ५६ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ९ बाद २६६ धावाच करु शकला. कृणाल पांड्याने ४८ चेंडूत ५१ धावा केल्या. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करणाºया भारताने २२ षटकात यजमानांची ४ बाद ९६ व २५ व्या षटकात ५ बाद १०९ अशी स्थिती केली. निशामने (३३) वर्करसह महत्त्वपूर्ण भागीदारी केली. भारताने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉला (२) गमावले. मयांक अगरवाल (३७), इशान किशन (४४) व अष्टपैलू विजय शंकर (४१) यांनी अपयशी झुंज दिली.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघन्यूझीलंड