Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारताविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 16:08 IST

Open in App

ऑकलंड, भारत विरुद्ध न्यूझीलंड : भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर तीन ट्वेन्टी-20 सामन्यांनी मालिकाही होणार आहे. भारताचा हा दौरा 23 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

न्यूझीलंडच्या संघात मिचेल सँटनरचे पुनरागमन झाले आहे. 9 महिन्यांनंतर सँटनर न्यूझीलंडच्या संघाकडून खेळताना दिसेल. 9 महिन्यांपूर्वी श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-20 सामन्यात सँटनरच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. सँटनरबरोबर या संघात टॉम लॅथम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांचेही पुनरागमन झाले आहे. संघाचे कर्णधारपद केन विल्यमसनकडे कायम ठेवण्यात आले आहे, त्याचबरोबर टॉड अॅस्टल आणि जिमी निशाम यांना दुखापतीमुळे संघात स्थान देण्यात आलेले नाही. 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 23 जानेवारीला होणार आहे, त्यानंतर दुसरा 26, तिसरा 28, चौथा 31 जानेवारी आणि पाचवा सामना 3 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर 6, 8 आणि 10 फेब्रुवारीला ट्वेन्टी-20 सामने रंगणार आहेत.

न्यूझीलंडचा संघ : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्तील, मॅट हेनरी, टॉम लाथम, कॉलिन मुनरो, हेनरी निकोल्स, मिचेल सँटनर, इश सोधी, टिम साउदी, रॉस टेलर.

भारताचा संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी, विजय शंकर, शुभमन गिल

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडकेन विलियम्सन