Join us

न्यूझीलंडचे मालिकेत निर्भेळ यश, श्रीलंकेला तिसऱ्या सामन्यातही नमवले

रॉस टेलर ( 137) आणि हेन्री निकोल्स ( 124*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेला नमवले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 11:37 IST

Open in App
ठळक मुद्देन्यूझीलंड संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेला नमवले रॉस टेलर ( 137) आणि हेन्री निकोल्स ( 124*) यांचे शतकन्यूझीलंडचे मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश

नेल्सन : रॉस टेलर ( 137) आणि हेन्री निकोल्स ( 124*) यांच्या शतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंड संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात श्रीलंकेला नमवले. न्यूझीलंडने 115 धावांनी हा सामना जिंकून मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. न्यूझीलंडच्या 364 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपूर्ण संघ 41.4 षटकांत 249 धावांत तंबूत परतला. किवींच्या ल्युक फर्ग्युसन ( 4/40) आणि इश सोधी ( 3/40) यांनी उत्तम गोलंदाजी केली.नाणेफेक जिंकून श्रीलंकेने यजमानांना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गुप्तील आणि कॉलीन मुन्रो यांना झटपट बाद केल्यानंतर श्रीलंकेचा आत्मविश्वास उंचावला होता. मात्र, कर्णधार केन विलियम्सन (55) आणि टेलर यांनी न्यूझीलंडला पुन्हा ट्रॅकवर आणले. दोघांनी शतकी भागीदारी करून न्यूझीलंडचा मजबूत पाया रचला. केन माघारी परतल्यानंतर टेलर व निकोल्स यांनी तुफान फटकेबाजी केली. टेलरने 131 चेंडूंत 9 चौकार व 4 षटकार खेचून 137 धावा केल्या. निकोल्सनेही 80 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकार खेचत नाबाद 124 धावा चोपल्या. न्यूझीलंडने 50 षटकांत 4 बाद 364 धावांपर्यंत मजल मारली.प्रत्युत्तरात श्रीलंकेची सुरुवात दमदार झाली, परंतु त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही. निक डिकवेला ( 46), धनंजया डिसिल्वा ( 36), कुसल परेरा ( 43) आणि थिसारा परेरा ( 80) यांनी संघर्ष केला. 

टॅग्स :न्यूझीलंडश्रीलंका