Doug Bracewell cocaine, Cricket Ban: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डग ब्रेसवेल याच्यावर एका सामन्यादरम्यान कोकेनचा वापर केल्याप्रकरणी एका महिन्याची बंदी घालण्यात आली आहे. स्पोर्टिंग इंटिग्रिटी कमिशनने एका निवेदनात खुलासा केला की, ३४ वर्षीय ब्रेसवेलने जानेवारीमध्ये वेलिंग्टन विरुद्ध सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सच्या होम T20 सामन्यापूर्वी कोकेनचा वापर केला होता. सामन्यानंतर झालेल्या चाचणीत तो पॉझिटिव्ह आढळला, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांसारख्या भारतीय दिग्गज फलंदाजांना बाद केले आहे.
एका महिन्याची बंदी, पण...
ब्रेसवेलने कोकेन सेवन केल्याचे त्याच्या टीमने मान्य केले. पण त्यासोबतच टीमने असेही सांगितले की, तो सामन्यापूर्वी कोकेन सेवन करून आला होता, त्यामुळे ज्याबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. त्याच्या कोकेन सेवनाचा सामन्याशी काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ब्रेसवेलला एप्रिल २०२४ पर्यंतच्या अंमली पदार्थांच्या सेवनासाठी एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. पण ही शिक्षा पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात आली होती, त्यामुळे त्याचे निलंबन पूर्ण झाले असून तो पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये सहभागी होऊ शकतो, असा निकाल देण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याने ट्रीटमेंट प्रोग्राममध्ये सहभाग घेतला होता, त्यामुळे त्याच्यावरील बंदीचा कालावधी ३ महिन्यांवरून १ महिन्यावर आणण्यात आला.
रोहित, सेहवाग, सचिनची घेतलेली विकेट
डग ब्रेसवेलने आतापर्यंत ४ डावात रोहित शर्माला गोलंदाजी केली, ज्यात तो दोनदा बाद झाला. या काळात रोहितने ४८ चेंडूंचा सामना केला आणि केवळ ३४ धावा केल्या. त्याशिवाय, त्याने ३ डावात सेहवागलाही २ वेळा बाद केले आहे. सेहवागने त्याला झोडपून काढले होते. त्या ३ डावातील ३८ चेंडूत सेहवागने ५३ धावा केल्या होत्या. भारताचा महान फलंदाज सचिनदेखील ब्रेसवेल विरुद्धच्या ३ डावांत एकदा बाद झाला. सचिनने आपल्या लौकिकाला साजेसा ४४ चेंडूत संयमी १२ धावा केल्या.