न्यूझीलंडला दबावावर करावी लागेल मात

वर्षी इंग्लंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत किवी संघाचे नशीब आडवे आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 01:15 AM2020-02-01T01:15:21+5:302020-02-01T01:15:34+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand must overcome pressure | न्यूझीलंडला दबावावर करावी लागेल मात

न्यूझीलंडला दबावावर करावी लागेल मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर लोकमत)

न्यूझीलंडचे सामने वारंवार का सुपर ओव्हरमध्ये जातात? हे आता रहस्यच झाले आहे. मात्र गेल्या सहा महिन्यातील सामने आणि निकाल पाहता न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये विजय कसा मिळावयचा हे अजून फारसे कळलेले नाही. गेल्या
वर्षी इंग्लंडविरुद्ध विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत किवी संघाचे नशीब आडवे आले. कारण सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी बरोबरी साधल्यानंतर कोणत्या संघाने जास्त चौकार लगावले, त्यावर विजेता निश्चित झाला. त्यानंतर नियम बदलले मात्र केन विल्यमसन आणि त्याच्या संघाला फारसा फायदा झाला नाही.
भारताविरुद्ध सुरू असलेल्या टी२० मालिकेतील सलग दोन सामन्यांत किवी संघाने विजयी मार्गावरुन पराभव पत्करला.
बुधवारी हॅमिल्टन येथे अखेरच्या षटकांत थरार होता. विजयासाठी फक्त ९ धावांची गरज होती. विल्यमसन आणि टेलर खेळपट्टीवर असताना विजय फक्त औपचारिकता होती. मात्र शमीने शानदार
गोलंदाजी केली आणि दोन्ही फलंदाज बाद झाले. चार चेंडूत दोन धावांचे आव्हान होते.
सुपर ओव्हरमध्ये रोहितने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार ठोकत सामना जिंकला होता. शुक्रवारीही न्यूझीलंडने भारताला १६५ धावातच रोखले. मात्र २०व्या षटकात विजयासाठी ७ धावांची गरज असताना पुन्हा न्यूझीलंडने
कच खल्ली आणि ४ बळी गमावले. टेलर आणि सीफर्ट चांगली फलंदाजी करत होते. न्यूझीलंडला अखेरच्या सहा चेंडूत सात धावा पाहिजे असताना केवळ सहाच धावा करता आल्या.
सुपर ओव्हर बुमराहच्या नियंत्रणात होती. त्यात न्यूझीलंडला फक्त १३ धावाच करता आल्या. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ४ -० अशी आघाडी घेतली असली तरी ही मालिका सहजपणे २-२ अशी होऊ शकली असती.
मायदेशात खेळताना न्यूझीलंडकडून पुन्हा पुन्हा सुपर ओव्हरमध्ये काय चुकले, हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत दबाव हाताळण्यात न्यूझीलंड अपयशी ठरले. न्यूझीलंडचे हे मानसिक खच्चीकरण होत आहे.
भारतासाठी रोहित, शमी, जडेजा चौथ्या सामन्यात खेळत नव्हते. त्यात कोहली आणि अय्यर यांनी धावा केल्या नाहीत. मात्र, मनिष पांड्ये याने अर्धशतक झळकावले. शार्दुल ठाकूरने दबावाच्या वेळी अचूकता राखली. बुमराह नेहमीप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाज होता. मात्र इतर गोलंदाजांना आपला खेळ उंचवावा लागेल.

Web Title: New Zealand must overcome pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.