इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला. इंग्लंडनं दुसऱ्याच मिनिटाला आघाडी घेतली होती, पण त्यानंतर बचावात्मक पवित्र्यात जाणे त्यांना महागात पडले. इटलीकडून आक्रमणाला सुरुवात झाली आणि इंग्लंडच्या बचाव फळीतीत त्रुटीचा फायदा उचलून त्यांनी बरोबरीचा गोल केला. १२० मिनिटांच्या खेळात १-१ ही बरोबरी कायम राहिली अन् पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं बाजी मारली. पण, या निकालावर न्यूझीलंड क्रिकेटपटू जरा नाराज दिसले. त्यांनी उपरोधिक ट्विट करत इंग्लंडला ट्रोल केले.
पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात रशफोर्ड, सांचो आणि बी साका या इंग्लंडच्या खेळाडूंना गोल करण्यात अपयश आलं. हेरी केन व एच मार्गुरे यांनी गोल केला, पण इटलीच्या तीन खेळाडूंनी गोल करून विजय पक्का केला. या निकालावरून न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जिनी निशॅम व माजी खेळाडू स्कॉट स्टायरिश यांनी इंग्लंडची फिरकी घेतली. निशॅम म्हणाला, पेनल्टी शूट आऊट का झाली.. ज्या संघाने सर्वाधिक पास केले त्यांना विजयी का घोषित केले गेला नाही?
तेच स्कॉट स्टायरिश म्हणाला, इंग्लंडने सर्वाधिक कॉर्नर्स घेतले मग त्यांना विजयी घोषित करायला हवं होतं. मला हे काही समजले नाही.
२०१९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला सर्वाधिक चौकारांच्या आधारावर विजयी घोषित करण्यात आले होते. न्यूझीलंडनं सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत रोखला होता. त्यावरून किवी खेळाडूंनी इंग्लंडची फिरकी घेतली.