वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय; दिग्गज खेळाडूंना वगळले, संघात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री!

भारताकडून वर्ल्ड कप हरल्यानंतर न्यूझीलंडने सुरू केली नव्या पर्वाची तयारी! अनेक दिग्गज संघाबाहेर, तर ३ तरुणांना सुवर्णसंधी. सविस्तर माहितीसाठी क्लिक करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 07:56 IST2026-03-11T07:55:17+5:302026-03-11T07:56:53+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
New Zealand Cricket Team: New Zealand's big decision after the defeat in the World Cup final; Veteran players are sacked, new faces enter the team! | वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय; दिग्गज खेळाडूंना वगळले, संघात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री!

वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंडचा मोठा निर्णय; दिग्गज खेळाडूंना वगळले, संघात नव्या चेहऱ्यांची एन्ट्री!

नवी दिल्ली: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भविष्याच्या दृष्टीने एक अत्यंत धाडसी पाऊल उचलले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या आगामी ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला १८ सदस्यीय संघ जाहीर केला असून, यामध्ये अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देत नव्या दमाच्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

या मालिकेसाठी न्यूझीलंडने 'हायब्रीड' कप्तानीची रणनीती आखली आहे. अनुभवी अष्टपैलू मिचेल सँटनर मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत संघाचे नेतृत्व करेल. त्यानंतर तो विश्रांती घेईल आणि शेवटच्या दोन सामन्यांसाठी टॉम लॅथमकडे कप्तानीची धुरा सोपवण्यात येईल. विशेष म्हणजे, लॅथमचे दीर्घकाळानंतर टी-२० संघात पुनरागमन झाले आहे.

तीन नव्या खेळाडूंचे पदार्पण
पुढील वर्ल्ड कप चक्रासाठी मजबूत 'बेंच स्ट्रेंथ' तयार करण्याच्या उद्देशाने न्यूझीलंडने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणाऱ्या तीन अनकॅप्ड खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.
१. कातेने क्लार्क (फलंदाज)
२. निक केली (फलंदाज)
३. जेडन लेनॉक्स (स्पिनर)

दिग्गजांना विश्रांती
वर्ल्ड कपमधील थकवा आणि व्यस्त वेळापत्रक पाहता फिन ॲलन, मार्क चॅपमन, डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र आणि टिम सीफर्ट यांसारख्या नियमित खेळाडूंना या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तसेच, वेगवान गोलंदाज मॅट हेन्री देखील वैयक्तिक कारणास्तव उपलब्ध असणार नाही. मात्र, काइल जेमिसन आणि जिमी नीशम यांसारखे अनुभवी खेळाडू संघात ठेवण्यात आले आहेत.

Web Title : वर्ल्ड कप हार के बाद न्यूजीलैंड टीम में बदलाव, दिग्गजों को विश्राम।

Web Summary : वर्ल्ड कप फाइनल में हार के बाद, न्यूजीलैंड ने दक्षिण अफ्रीका के खिलाफ आगामी टी20 श्रृंखला के लिए नई टीम घोषित की। कई वरिष्ठ खिलाड़ियों को आराम दिया गया है, मिचेल सेंटनर पहले तीन मैचों में और टॉम लैथम अंतिम दो में कप्तानी करेंगे। तीन नए खिलाड़ियों को मौका मिला।

Web Title : New Zealand overhauls squad after World Cup loss; veterans rested.

Web Summary : Following their World Cup final defeat, New Zealand has named a new-look squad for the upcoming T20 series against South Africa. Several senior players are rested, with Mitchell Santner captaining the first three games, and Tom Latham the final two. Three uncapped players earn their debut.