Join us

BREAKING NEWS: १८ वर्षांनंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात आला अन् एकही सामना न खेळता दौरा रद्द केला

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) शुक्रवारी मोठा धक्का बसला. १८ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघानं पहिला सामना खेळण्यापूर्वीच दौरा रद्द केला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 15:21 IST

Open in App

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ( PCB) शुक्रवारी मोठा धक्का बसला. १८ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंड संघानं पहिला सामना खेळण्यापूर्वीच दौरा रद्द केला. आजपासून पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यातल्या वन डे मालिकेला सुरुवात होणार होती. पण, दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर आलेच नाही. सुरुवातीला न्यूझीलंडचे तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याचे वृत्त पसरले होते, त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले गेले. पण, हा दौरा रद्द  होण्यामागे वेगळेच कारण निघाले. न्यूझीलंड सरकारनं सुरक्षेबाबत अलर्ट दिल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. ( The BLACKCAPS are abandoning their tour of Pakistan following a New Zealand government security alert)  न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी डेव्हीड व्हाईट यांनी सांगितले की, आम्हाला  security alert देण्यात आला आणि त्यानंतर हा दौरा कायम राखणे आम्हाला शक्य नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ( PCB) हा मोठा धक्का आहे, याची आम्हाला जाण आहे. पण, खेळाडूंची सुरक्षा ही आमचे प्राधान्यक्रम आहे आणि दौरा तुर्तास रद्द करणे हेच योग्य आहे.''न्यूझीलंड सरकारनं सुरक्षिततेबाबत धोका असल्याचे कळवले आणि त्यामुळेच खेळाडू हॉटेलच्या बाहेर पडले नाही. आता त्यांना मायदेशात पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.   PCBनं म्हटलं की,न्यूझीलंडच्या राष्ट्रध्यक्षांशी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः फोनवरून चर्चा केली. आमच्याकडे जगातील सर्वोत्तम intelligence systems असल्याचे सांगून न्यूझीलंड संघाला कोणताच धोका नसल्याचे ते म्हणाले.   न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानसोबत ३ वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार होता. १७, १९ व २१ सप्टेंबर असे वन डे सामने होणार होते त्यानंतर २५, २६, २९ सप्टेंबर, १ व ३ ऑक्टोबर असे ट्वेंटी-२० सामने होणार होते.  

टॅग्स :न्यूझीलंडपाकिस्तान
Open in App