IND vs NZ ODI Series : टीम इंडियाला पराभवाचा धक्का! वनडे मालिका विजयासह न्यूझीलंड संघानं रचला इतिहास

संघ अडचणीत असताना विराट कोहली लढला. त्याने दमदार शतकासह भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 21:45 IST2026-01-18T21:43:52+5:302026-01-18T21:45:39+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
New Zealand Create History Beats India By 41 Runs To Clinch ODI Series By 2-1 First Time Won In Indian Soil | IND vs NZ ODI Series : टीम इंडियाला पराभवाचा धक्का! वनडे मालिका विजयासह न्यूझीलंड संघानं रचला इतिहास

IND vs NZ ODI Series : टीम इंडियाला पराभवाचा धक्का! वनडे मालिका विजयासह न्यूझीलंड संघानं रचला इतिहास

IND vs NZ ODI Series : न्यूझीलंडच्या संघाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगलेल्या  निर्णायक एकदिवसीय सामन्यातील विजयासह ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका २-१ अशी खिशात घातली. ज्या मैदानावर भारतीय संघाने एकही सामना गमावला नव्हता त्या मैदानात नव्या खेळाडूंचा भरणा असलेल्या  न्यूझीलंडच्या संघाने टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. एवढेच नाही तर ३८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या संघाने भारतीय मैदानात एकदिवसीय मालिका जिंकली. ८ नव्या चेहऱ्यांसह न्यूझीलंडच्या संघाने आठव्या प्रयत्नात पहिल्या मालिका विजयाचा डाव साधत नवा इतिहास रचला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

दोन शतकाला रिप्लाय देताना किंग कोहलीची दमदार खेळी, पण... 

डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या संघाने निर्णायक लढतीत टीम इंडियासमोर ३३८ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघातील आघाडीच्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले. संघ अडचणीत असताना विराट कोहली लढला. त्याने दमदार शतकासह भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. त्याला नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा यांनी अर्धशतकी खेळीसह साथ दिली. पण मोक्याच्या क्षणी या दोघांच्या विकेट्स पडल्या अन्  शेवटी विराट शतक व्यर्थ ठरले. नवव्यांदा कोहलीच्या शतकानंतर टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली.  विराट कोहलीनं १०८ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १२४ धावांची खेळी केली. याशिवाय नितीश कुमार रेड्डीनं ५७ चेंडूत ५३ धावांचे योगदान दिले. हर्षित राणानं वनडेतील पहिले अर्धशतक झळकावताना ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ४६ षटकात सर्वबाद २९६ धावांपर्यंत मजल मारली.

Daryl Mitchell नं सेंच्युरीसह रचला इतिहास! टीम इंडियाविरुद्ध अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज

न्यूझीलंडच्या संघाने ३८ वर्षांत आठव्या प्रयत्नात साधला पहिल्या मालिका विजयाचा डाव 

 १९८८ पासून न्यूझीलंडच्या संघाने  दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या संघासह भारतीय मैदानात सात वेळा टीम इंडियाला एकदिवसीय मालिकेत टक्कर दिली. पण आतापर्यंत एकदाही या संघाला यश मिळाले नव्हते. मायकेल ब्रेसवेलच्या नेतृत्वाखालील अतिशय कमी अनुभवी असलेला संघ टीम इंडियाला मोठा धक्का देईल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पण अनुभवापेक्षा जिद्द आणि क्षमतेच्या जोरावर मैदान मारता येते, ही गोष्टच युवा संघाने इंदूरच्या मैदानात दाखवून दिली. आठव्या प्रयत्नात न्यूझीलंडच्या संघाने भारतीय मैदानात पहिली एकदिवसीय मालिका जिंकली. या ऐतिहासिक विजयात डॅरिल मिचेल याने तिन्ही सामन्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मालिकेत पिछाडीवर पडल्यावर उर्वरित दोन सामन्यात बॅक टू बॅक सेंच्युरीसह त्याने संघाला मालिका विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

नव्या वर्षात टीम इंडियावर ओढावली मालिका गमावण्याची नामुष्की

टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील वडोदरा येथील पहिल्या सामन्यात विजयासह नव्या वर्षाची दिमाखदार सुरुवात केली. पण राजकोटच्या मैदानात न्यूझीलंडने पलटवार करत मालिकेत बरोबरीचा डाव साधला.  इंदूरच्या मैदानात भारतीय संघाने एकही वनडे सामना गमावला नव्हता. पण न्यूझीलंडने बालेकिल्ल्यात सुरुंग लावत टीम इंडियाविरुद्ध ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. याउलट भारतीय संघावर नव्या वर्षात घरच्या मैदानात मालिका गमावण्याची  नामुष्की ओढावली. २०२२ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघाने नाणेफेक जिंकल्यावर सलग १३ विजयानंतर पहिल्यांदाच वनडे सामना गमावला आहे. २०१६ नंतर ऑस्ट्रेलिया पाठोपाठ न्यूझीलंड हा आता दुसरा संघ ठरला ज्यांनी घरच्या मैदानात टीम इंडियाला वनडे मालिकेत पराभवाचा धक्का दिला आहे. 

Web Title : न्यूजीलैंड ने भारत को हराया, वनडे सीरीज में ऐतिहासिक जीत दर्ज की।

Web Summary : न्यूजीलैंड ने इंदौर में भारत को हराकर 2-1 से वनडे सीरीज जीती। कोहली के शतक और रेड्डी और राणा के योगदान के बावजूद, न्यूजीलैंड ने 38 वर्षों के बाद भारत में अपनी पहली वनडे सीरीज जीती, जो एक ऐतिहासिक क्षण है।

Web Title : New Zealand stuns India, clinches ODI series victory in India.

Web Summary : New Zealand defeated India in Indore, winning the ODI series 2-1. Despite Kohli's century and contributions from Reddy and Rana, New Zealand secured their first ODI series win in India after 38 years, marking a historic moment.