NZ vs PAK : न्यूझीलंडनं पाकिस्तानची लाज काढली; जागतिक क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान पटकावले

New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.

By स्वदेश घाणेकर | Published: January 6, 2021 09:43 AM2021-01-06T09:43:49+5:302021-01-06T09:44:33+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand becomes number 1 Test team for the first time in the history, they beat Pakistan by by an innings and 176 runs | NZ vs PAK : न्यूझीलंडनं पाकिस्तानची लाज काढली; जागतिक क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान पटकावले

NZ vs PAK : न्यूझीलंडनं पाकिस्तानची लाज काढली; जागतिक क्रमवारीत प्रथमच अव्वल स्थान पटकावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

New Zealand vs Pakistan : केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघानं ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा धुव्वा उडवून न्यूझीलंडनं इतिहासात प्रथमच जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. न्यूझीलंडनं दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर एक डाव व १७६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडनं पहिल्या डावात घेतलेल्या ३६२ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा दुसरा डाव १८६ धावांवर गडगडला. या विजयासह न्यूझीलंडनं कसोटी मालिका २-० अशी खिशात घातली आणि ICC कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले.


अझर अली ( ९३) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान ( ६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात २९७ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं ६९ धावांत ५ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे तीन फलंदाज ७१ धावांवर माघारी परतले होते. पण, विलियम्सन व निकोल्स यांनी पाकिस्तानी संघाची हवाच काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अफलातून फलंदाजी केली. त्यांच्या ३६९ धावांच्या भागीदारीमुळे संघानं ५०० धावांचा पल्ला ओलांडला. निकोल्स २९१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकार मारून १५७ धावांवर माघारी परतला. 

दुसरीकडे विलियम्सन खेळपट्टीवर नांगर रोवून उभाच होता. विलियम्सननं ३६४ चेंडूंत २८ चौकारांसह २३८ धावा केल्या. डॅरील मिचेलनं ११२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२ धावा करतान विलियम्सननं डाव घोषित केला. न्यूझीलंडनं ६ बाद ६५९ धावांवर डाव घोषित करून पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी घेतली.


पाकिस्तानचा दुसरा डावही गडगडला. कायले जेमिन्सननं पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना सहा विकेट्स घेतल्या. ट्रेंट बोल्टनं ३ विकेट्स घेत त्याला साथ दिली. फलंदाजीत कमाल दाखवणाऱ्या केननं गोलंदाजीवरही हात आजमावला आणि कसोटीतील पहिली विकेट नावावर केली. या विजयानंतर न्यूझीलंडच्या खात्यात ११८ गुण जमा झाले आहेत. ऑस्ट्रेलिया ( ११६) व भारत ( ११४) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत.

हायलाईट्स
- न्यूझीलंडनं प्रथमच आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
-  प्रथमच त्यांनी सलग सहा कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.
- घरच्या मैदानावर मागील १७ सामन्यांत त्यांनी अपराजित मालिका कायम राखली आहे.  
- २०११नंतर त्यांनी घरच्या मैदानावर एकाही कसोटीत पराभूत पत्करलेला नाही. 

Web Title: New Zealand becomes number 1 Test team for the first time in the history, they beat Pakistan by by an innings and 176 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.