चॅम्पियन्स ट्रॉफी आधी न्यूझीलंडनं जिंकली फायनल; पाकचा घरच्या मैदानात पाडला बुक्का!

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रंगलेल्या तिरंगी मालिकेत या दोन संघांसह दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा समावेश होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 00:37 IST2025-02-15T00:35:11+5:302025-02-15T00:37:14+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand Beat Pakistan And Win Tri-Series Title Ahead Of Champions Trophy | चॅम्पियन्स ट्रॉफी आधी न्यूझीलंडनं जिंकली फायनल; पाकचा घरच्या मैदानात पाडला बुक्का!

चॅम्पियन्स ट्रॉफी आधी न्यूझीलंडनं जिंकली फायनल; पाकचा घरच्या मैदानात पाडला बुक्का!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघानं घरच्या मैदानावर खेळणाऱ्या पाकिस्तानला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी रंगलेल्या तिरंगी मालिकेच्या फायनल जिंकली आहे. कराची नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या फायनल लढतीत पहिल्यांदा बॅटिंग करताना पाकिस्तानचा संघ ४९.३ षटकात अवघ्या २४२ धावांत आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघानं ५ विकेट्स आणि २८ चेंडू राखून विजय मिळवला होता. न्यूझीलंडच्या संघानं दक्षिण आफ्रिकेसह पाकला पराभूत करत फायलनचे तिकीट पक्के केले होते. त्यानंतर शेवटी त्यांची स्पर्धा मारली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन फायनल गाठणाऱ्या पाकिस्तानच्या संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी आधी पराभवाचा सामना करावा लागला.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!


विल्यम ओ'रुर्कचा भेदक माऱ्यामुळे पाक कॅप्टनचा रिझवानचा निर्णय ठरला फसवा

तिरंगी मालिकेतील फायनल लढतीमध्ये पाकिस्तानचा कॅप्टन मोहम्मद ऱिझवान याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. विल्यम ओ'रुर्क याच्या भेदक माऱ्यासमोर त्याचा हा निर्णय फसवा ठरला. न्यूझीलंडच्या ताफ्यातील या गोलंदाजाने चौघांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्याशिवाय मायकेल ब्रेसवेल आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी एक-एक तर जेकॉब आणि नॅथन स्मिथ यांनी प्रत्येकी एक-एक विकेट आपल्या खात्यात जमा करत पाकिस्तानचा डाव २४२ धावांत आटोपला. 

पाकनं रडत खडत गाठला होता २४२ धावांचा आकडा

 विकेट किपर बॅटर आणि कॅप्टन मोहम्मद रिझवान याने ७६ चेंडूत केलेल्या ४६ धावांची खेळी शिवायसलमान अली आगा याने ६५ चेंडूत ४ धावाची खेळी केली. तय्यब ताहिर ३८ (३३), फहीम अश्रफ २२ (२१) आणि नसीम शाह १९ (१७) यांनी दिलेल्या योगदानामुळे पाकच्या संघाने रडत खडत २४२ धावांचा आकडा गाठला होता. 

आधी केन-डेवॉन कॉन्वेनं सावरलं; मग डॅरियल मिचेलनं टॉम लॅथमच्या भात्यातून आली फिफ्टी

पाकिस्तानच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना विल यंगच्या रुपात न्यूझीलंडच्या संघानं अवघ्या ५ धावांवर पहिली विकेट गमावली. पण त्यानंतर डेवॉन कॉन्वे आणि केन विलियम्सन या जोडीनं ७१ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. केन ३४ धावा करून तंबूत परतल्यावर  डेवॉन कॉन्वे ४८ धावांवर बाद झाला. ही जोडी आउट झाल्यावर पाकिस्तानच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण त्यानंत डॅरियल मिचेल ५७ (५८) आणि टॉम लॅथम ५६ (६४ ) यांच्या अर्धशतकीनं पाकच्या मनसुब्यांवर पाणी फेरले. ग्लेन फिलिप्स २० (१७) आणि ब्रेसवेल २ (३) या जोडीनं नाबाद राहून संघाचा विजय निश्चित केला.

Web Title: New Zealand Beat Pakistan And Win Tri-Series Title Ahead Of Champions Trophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.