Join us  

हसावं की रडावं! टार्गेटशिवायच बॅट्समन खेळू लागले; न्यूझीलंड-बांग्लादेश टी-२० मॅचमध्ये अजब घडले

new zealand vs bangladesh 2021 T20 Series: न्यूझीलंड-बांग्लादेश या दोन संघांदरम्यान टी-२० सीरीज सुरु आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये बांग्लादेशने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 17.5 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 173 रन्स केले होते. तेव्हा अचानक पाऊस सुरु झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 4:07 PM

Open in App

नेपियर: तसे पाहता क्रिकेटला (Cricket) मोठा इतिहास आहे. खूप वर्षांपासून हा खेळ खेळला जातो. परंतू आज जो न्यूझीलंड आणि बांग्लादेशमध्ये किस्सा घडला तो आजपर्यंत कधीच घडला नव्हता आणि पुन्हा कधीही घडण्याची शक्यता नाही. न्यूझीलंड-बांग्लादेशमध्ये टी20 मॅच (new zealand vs bangladesh 2021 T20 Series) सुरु होती. तेव्हा टार्गेट न देताच दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाल्याचा प्रकार घडला. ("How Is It Possible": Confusion Over Revised DLS Target Halts New Zealand vs Bangladesh 2nd T20I)

झाले असे की, न्यूझीलंड-बांग्लादेश या दोन संघांदरम्यान टी-२० सीरीज सुरु आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये बांग्लादेशने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने 17.5 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 173 रन्स केले होते. तेव्हा अचानक पाऊस सुरु झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या डावातील खेळ पूर्ण झाला नाही. यामुळे नियमाप्रमाणे डीएलएस वापरण्यात आले. हा नियम असा आहे की, त्यामुळे नेहमीच वाद. चर्चा होत राहतात. आता त्यात या अजब प्रकाराची भर पडली आहे. 

जेव्हा बांग्लादेशचे फलंदाज खेळण्य़ासाठी मैदानात उतरले तेव्हा बांग्लादेशला DLS प्रमाणे किती रन्सचे लक्ष्य द्यायचे यावरून संभ्रम निर्माण झाला. पहिला चेंडू, दुसरा चेंडू असे तीन चार चेंडू झाल्यावर त्यांना 148 रन्स जिंकण्यासाठी दिल्याचे जाहीर करण्यात आले. हा डीएलएसचा खेळ एवढ्य़ावरच थांबला नाही. आणखी हसू होणे बाकी होते. 

न्यूझीलंडचा गोलंदाज हैमिश बैनेट डावाचे दुसरे षटक टाकत होता. तेवढ्यात पुन्हा नवीन लक्ष्य देण्यात आले. त्या ओव्हरचे तीन बॉल झाले होते. यामुळे खेळ थांबवावा लागला. बांग्लादेशला 16 ओव्हरमध्ये 171 रन्सचे लक्ष्य देण्य़ात आले. मॅच रेफ्री जैफ क्रो देखील गोंधळून गेले होते. ते सारखे मॉनिटर आणि डीएलएस शीट पाहू लागले. या दरम्यान कोणालाच काही कळत नव्हते. बांग्लादेशचे व्यवस्थापकही क्रो यांना भेटायला गेले. यानंतर मॅच पुढे सुरु झाली आहे. 

 

टॅग्स :न्यूझीलंडबांगलादेशटी-20 क्रिकेट