विराट कोहली आणि अनुष्का शर्मा जोडी कपल गोल सेट करण्यात सर्वात आघाडीवर असणारी जोडी आहे. सर्वात चर्चित आणि लोकप्रिय कपलने आपल्या मुलांना सामान्य आयुष्य जगता यावे, या उद्देशाने लंडनला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. ही गोष्ट फॅमिली गोल सेट करण्याचे एक उत्तम उदाहरणच आहे. मुलांसह दोघेही परदेशात वास्तव्य करत असले तरी त्यांची भारतातील क्रेझ काही कमी झालेली नाही. नव्या वर्षात विराट कोहलीनं तब्बल ९१ दिवसांनी अनुष्कासोबतचा खास फोटो शेअर केला. नव्या वर्षांतील या जोडीचा नवा लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेचा विषय ठरत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"जिच्यामुळे आयुष्य उजळलं, तिच्यासोबत...."
'किंग' कोहलीने आपल्या 'क्वीन'सोबत खास फोटो शेअर करत पुन्हा एकदा एकमेकांवरील प्रेम दाखवून दिले आहैे. विराट कोहलीनं जो फोटो शेअर केलाय त्यात तो सिंपल लूकसह चेहऱ्यावर 'स्पायडर मॅन' मास्क घालून उभे असल्याचे दिसते. या फोटोत अनुष्का शर्मानं फुलपाखराची छबी असणारा अर्थात तितली मास्क घातला आहे. "जिच्यामुळे आयुष्य उजळलं, तिच्यासोबत २०२६ च्या नव्या वर्षाची सुरुवात करत आहे, अशा आशयाच्या खास कॅप्शनसह विराट कोहलीनं हा फोटो शेअर करत पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मावर प्रेम व्यक्त केले आहे.
आधी क्रिकेटरचं नाव घेतलं! आता ही 'बोल्ड' अभिनेत्री म्हणते की, आमच्यात...
धोनी-साक्षी जोडीनं आपल्या 'राजकुमारी'सोबतच्या फोटोनं लुटली मैफील
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा सोशल मीडियावर फारसा सक्रीय नसतो. पण त्याची पत्नी साक्षी धोनी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. तिने खास फॅमिली फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. साक्षीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून जो फोटो शेअर केला आहे त्यात तिच्यासह MS धोनीची गोल्डन हॅटमधील हटके आणि कूल स्टायलिश लूकची झलक पाहायला मिळते. या फोटोत दोघांची लाडली झिवाही दिसते. आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर MS धोनी IPL च्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्या वर्षात मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. नव्या वर्षात तो फॅमिलीसोबत थायलंडमध्ये फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करताना दिसत आहे.