भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि मॉडेल सपना गिल यांच्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला अन् न्यायालयात अहवालही दाखल केला. पण, आता या प्रकरणातील एक नवा व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यात क्लबमध्ये असताना नेमकं काय झालं होतं ते समोर येतंय. १५ फेब्रुवारी Barrel Mansion नाईट क्लबमध्ये हा प्रकार घडला होता.
CCTV फुटेजमध्ये पृथ्वी शॉ सपनाचा मित्रा शोबहित ठाकूर याच्यासोबत दिसतोय... हा व्हिडीओ सपनाच्या लिगल टीमने जाहीर केला आहे. यात पृथ्वी त्याच्या मित्रांसोबत दिसतोय आणि एक व्यक्ती त्याच्याजवळ येऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतोय. यावेळी त्या व्यक्तीकडून चुकीची कृती होताना दिसतेय आणि त्यानंतर पृथ्वीने त्याला ढकलले. तिथून वाद सुरू झाला. यात कुठेच सपना गिल दिसत नाही. तिने पृथ्वीवर छळ केल्याचा आरोप केला होता.
दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याच्यावर मॉडेल सपना गिल हीने विनयभंग आणि शारीरिक छळवणूकीचा आरोप केला होता. मुंबई पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला होता. सोमवारी मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासाचा अंतिम अहवाल न्यायालयात दाखल केला आणि त्यात त्यांनी पृथ्वीवरील आलोप चुकीचे आणि बिनवुडाचे असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात पृथ्वी निर्दोष असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.
पोलिसांनी CCTV फुटेजही पाहिले आणि त्यात सपना गिल तिच्या कारमधून पृथ्वी शॉच्या गाडीचा पाठलाग करताना दिसत आहे आणि तिच्या हातात बेसबॉल बॅटही दिसत आहे. तिने त्याने पृथ्वीच्या गाडीवर हल्ला केल्याचेही, पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांनी यावेळी CISF अधिकाऱ्याचीही साक्ष नोंदवली. त्यांनीही सपनाच्या आरोपत तथ्य नसल्याचे सांगितले.