Join us  

Pushpa New Action in Trending, Shakib Al Hasan: श्रीवल्ली, सामी अन् 'पुष्पराज' वाल्या डायलॉग नंतर आता अल्लू अर्जुनच्या नवीन अ‍ॅक्शनचा ट्रेंड; क्रिकेटर्सना 'याड लागलं'

पुष्पा चित्रपटातीली गाणी, डायलॉग्स अन् डान्स स्टेप्सनी साऱ्यांनाच वेड लावलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 5:59 PM

Open in App

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपट सध्या देशभर धुमाकूळ घालत आहेच पण देशाबाहेरही याचा चाहता वर्ग तयार होताना दिसतोय. स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांना 'पुष्पा'ने वेड लावल्यानंतर आता बांगलादेशचा अनुभवी क्रिकेटपटू शाकीब अल हसनही या चित्रपटातील एका सीनची नक्कल करताना दिसला.

सध्या सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मध्ये 'पुष्पा'चा ट्रेंड झपाट्याने पसरताना दिसतोय. बांगलादेशी गोलंदाज नझीमुल इस्लाम अपू आणि विंडिजचा माजी क्रिकेटर ड्वेन ब्राव्हो यांनी अल्लू अर्जुनच्या डान्सची नक्कल केली होती. त्यानंतर आता शाकीबनेही अल्लू अर्जूनच्या एका सीनची नक्कल केली. कोमिला व्हिक्टोरियन्स आणि फॉर्च्यून बारिशाल यांच्यातील लीग सामन्या दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसची विकेट घेतल्यानंतर शाकीबने ही अँक्शन केली.

व्हिक्टोरियन्स संघाच्या डावाच्या सहाव्या षटकात ही घटना घडली. पॉवर-प्ले संपण्याच्या अगदी अगोदर शेवटच्या चेंडूवर फॉर्च्युन बारिशालचा कर्णधार शाकीबने फाफ डु प्लेसिसला हवेत फटका मारण्यासाठी सोपा चेंडू टाकला. पण त्याला चेंडू नीट टोलवता न आल्याने तो बाद झाला. झियाउर रहमानने त्याचा अगदी सहज झेल टिपला. त्यानंतर डु प्लेसिसची विकेट घेतल्याचा आनंद शाकीबने अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'मधील एका अँक्शनची नक्कल करत केली.

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदानाबांगलादेश
Open in App