Join us

Virat Kohli Tweet : विराट कोहलीने पाकिस्तानच्या जखमेवर चोळले मीठ; भारतीयांसाठी केले खास ट्विट

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय चाहत्यांना अपेक्षित निकाल टीम इंडियाला मिळवता आला नाही. इंग्लंडकडून उपांत्य फेरीत भारताला हार मानावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 11:17 IST

Open in App

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय चाहत्यांना अपेक्षित निकाल टीम इंडियाला मिळवता आला नाही. इंग्लंडकडून उपांत्य फेरीत भारताला हार मानावी लागली. इंग्लंडने एकतर्फी हा विजय मिळवला आणि त्यानंतर फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवून वर्ल्ड कपही जिंकला. भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले असले तरी पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीने ( Virat Kohli) केलेल्या खेळीने इतिहासात नाव नोंदवले. विराटच्या नाबाद ८२ धावांच्या अविस्मरणीय खेळीने तमाम भारतीयांच्या मनात घर केले आणि पाकिस्तानींना मोठी जखम दिली. आता त्याच जखमेवर विराटने शनिवारी मीठ चोळण्याचं काम केलं. 

BCCI ने आणखी एक विकेट काढली! राहुल द्रविडने निवडलेल्या खास माणसाच्या करारात केली नाही वाढ

पाकिस्तानने विजयासाठी ठेवलेल्या १६० धावांचा पाठलाग करताना भारताने ७ षटकांत ३१ धावांत ४ फलंदाज गमावले होते. विराट व हार्दिक पांड्याच्या शतकी भागीदारीने भारताला पुन्हा फ्रंटसीटवर आणून बसवले. शाहिन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह या गोलंदाजांची विराटने अखेरच्या षटकांत धुलाई केली. २०व्या षटकात मोहम्मद नवाजला गोलंदाजीला बोलावले गेले आणि आर अश्विनने विजयी धाव घेत पाकिस्तानची हार पक्की केली. रौफला विराटने मारलेले ते दोन षटकार सामन्याला कलाटणी देणारे ठरले. या स्पर्धेत विराटने सर्वाधिक २९६ धावा केल्या.  

शनिवारी विराटने याच खेळीतील फोटो पोस्ट केला. ''२३ ऑक्टोबर २०२२ या तारखेला माझ्या हृदयात स्पेशल स्थान आहे.  यापूर्वी क्रिकेटच्या सामन्यात एवढी ऊर्जा कधी पाहिली नव्हती. ती सायंकाळ काय होती...'' 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२विराट कोहलीभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App