Join us  

रवी शास्त्रींच्या फेरनिवडीनंतर नेटिझन्स संतापले; ही तर आगामी वर्ल्ड कप पराभवाची तयारी!

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर अखेर रवी शास्त्रीच यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 1:02 PM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर अखेर रवी शास्त्रीच यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. या पदासाठी सहा जणांमध्ये चुरस रंगली होती, परंतु शास्त्रींनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. कॅप्टन विराट कोहलीनेही आपले वजन शास्त्रींच्या तराजूत टाकले होते. त्यामुळे कोहलीची ईच्छा पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. पण, शास्त्री यांची निवड क्रिकेट चाहत्यांना पटणारी नाही. त्यांनी सोशल मीडियावर शास्त्रींना ट्रोल करायला सुरुवात केली...ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मूडी आणि न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू व आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे माजी प्रशिक्षक माइस हेसन यांच्यासह 2007 सालच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप  विजेत्या भारतीय संघाचे तत्कालीन व्यवस्थापक लालचंद राजपूत, मुंबई इंडियन्सचे माजी प्रशिक्षक रॉबिन सिंग, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स यांनीही या पदासाठी अर्ज केले होते. शास्त्री भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची मुलाखत व्हिडीओ कॉन्फरन्सने घेण्यात आली. त्यांनी सर्वात शेवटी मुलाखत दिली.  मुलाखतीपूर्वीच सिमन्स यांनी माघार घेतली. सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. 2016 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यात देखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी वैयक्तिक कारण देताना माघार घेतली आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी पाच जणांमध्ये चुरस रंगली होती. 

शास्त्री यांनी भारताकडून खेळताना त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याचबरोबर समालोचनही त्यांनी केले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शास्त्री यांना या पदावर कायम ठेवणार की त्यांचे हे पद जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रवी शास्त्री हे संघाचे जून 2016 पर्यंत संचालक होते. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक म्हणून झाली.

टॅग्स :रवी शास्त्रीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ