Join us

बलात्कार केल्याप्रकरणी संदीप लामिछानेला ठरवले दोषी; दिल्लीकडून IPLमध्ये केलं होतं पदार्पण

नेपाळ न्यायालयाने संदीप लामिछानेला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 20:21 IST

Open in App

नेपाळ संघाचा स्टार क्रिकेटर संदीप लामिछानेचे क्रिकेट करिअर धोक्यात आले आहे. नेपाळन्यायालयाने संदीप लामिछानेला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यामुळे संदीपचे क्रिकेट करिअरही आता धोक्यात आले आहे. 

एका १७ वर्षीय तरुणीने तिला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप संदीपवर केला होता. त्यानंतर आज अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेपाळ न्यायालयाने संदीप लामिछानेला दोषी ठरवले आहे. 

सदर प्रकरणी संदीपला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची सुनावणीआधी कोठडीत रवानगीही केली होती. मात्र, २० लाखांच्या जामीनावर संदीपची सुटका करण्यात आली. बिग बॅश लीग आणि आयपीएलमध्ये खेळलेल्या संदीपला परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासही न्यायालयाने बंदी घातली होती.

पुढील सुनावणीत शिक्षेबाबत निर्णय घेतला जाणार-

संदीप लामिछानेची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने देशाच्यावतीने अनेक स्पर्धांमध्ये भागही घेतला होता. संदीपच्या शिक्षेबाबत न्यायालयाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. संदीपच्या शिक्षेबाबत पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

दिल्लीकडून आयपीएलमध्ये पदार्पण-

संदीप लामिछाने आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला होता. दिल्ली कॅपिटल्सच्यावतीने २०१८मध्ये आयपीएलमध्ये संदीपने पदार्पण केले. संदीपने या लीगमध्ये एकूण दोन हंगामात भाग घेतला आणि एकूण १३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. तथापि, २०१९ पासून, कोणत्याही संघाने त्याला आयपीएलमध्ये घेण्यास फारसा रस दाखवला नाही.

टॅग्स :नेपाळन्यायालयलैंगिक छळ