Join us

"तो बोलला होता, मी एक दिवस हिरोईनशी लग्न करेन", विराटच्या मित्राच्या आईचा खुलासा

virat kohli childhood friends : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 12:56 IST

Open in App

virat kohli and anushka sharma  | नवी दिल्ली : सध्या आयपीएलच्या सोळाव्या (IPL 2023) हंगामाचा थरार रंगला आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  (DC vs RCB) यांच्यातील सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. दिल्लीचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळत असला तरी हा सामना आरसीबीचा प्रमुख खेळाडू विराट कोहलीसाठी खास असणार आहे. विराट पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामन्यासाठी विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत आधीच दिल्लीला रवाना झाला होता. बुधवारी त्यांनी फ्रेंच दूतावासालाही भेट दिली. कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा, बालपणीचा मित्र शलाज सोंधी आणि त्याची आई नेहा सोंधी यांच्याशी गप्पा मारल्यानंतर, आरसीबीने पडद्यामागील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

शलाज सोंधी आणि विराट कोहली हे दोघेही नवी दिल्लीतील राजकुमार शर्मा अकादमीमध्ये खेळले होते. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, शलाज सोंधीची आई नेहा सोंधी विराटबद्दलच्या आठवणींना उजाळा देताना म्हणतात, "विराटने एकदा बॅनरवरील फोटो पाहून सांगितले होते की, तो एक दिवस हिरोईनशी लग्न करेल."

आयपीएल २०२३ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. आतापर्यंत सर्वच संघांनी नऊ ते दहा सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. लक्षणीय बाब म्हणजे आताच्या घडीला सर्व दहा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहेत. १२ गुणांसह गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे, तर आरसीबीचा संघ दहा गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मारॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टऑफ द फिल्ड
Open in App