England vs Netherland ODI : जोस बटलर ( Jos Buttler), फिल सॉल्ट ( Phil Salt ) व डेवीड मलान ( Dawid Malan ) या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. फिल सॉल्ट व डेवीड मलान यांनी २२२ धावांची भागीदारी करून मजबूत पाया रचला. त्यानंतर जोस बटलरचे वादळ घोंगावले. त्याला लिएम लिव्हिंगस्टोनची ( Liam Livingstone) साथ मिळाली आणि या दोघांनी १२ षटकांत १९८ धावांची खेळी केली. इंग्लंडने वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम पुन्हा नावावर करताना ४ बाद ४९८ धावा केल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Jos Buttler, NED vs ENG : World Record करणाऱ्या इंग्लंडचा दणदणीत विजय, नोंदवला आणखी एक विक्रम
Jos Buttler, NED vs ENG : World Record करणाऱ्या इंग्लंडचा दणदणीत विजय, नोंदवला आणखी एक विक्रम
England vs Netherland ODI : इंग्लंडने पहिल्या वन डे सामन्यात ४९८ धावांची रेकॉर्ड ब्रेक खेळी केली आणि त्यानंतर नेदरलँड्सवर दणदणीत विजय मिळवला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 22:58 IST