Join us  

ndia Vs Bangladesh, Latest News : टीम इंडियात आज एक बदल दिसणार; बांगलादेशची डोकेदुखी वाढणार?

भारतीय संघाच्या अखेरच्या दोन साखळी सामन्यातला एक सामना आज होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 12:38 PM

Open in App

बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाच्या अखेरच्या दोन साखळी सामन्यातला एक सामना आज होणार आहे. ११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीतील स्थानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल. तर बांगलादेशसाठी (७) आव्हान टीकवण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघ या सामन्यात काही प्रयोग करण्याची शक्यता आहे. चौथ्या क्रमांकासाठी संघ काही खेळाडूंची चाचपणी करू शकतो. 

त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. फलंदाज प्रशिक्षक संजय बांगरनेही तसे संकेत दिले होते. विजय शंकरच्या दुखापतीनंतर रिषभ पंतचा मार्ग मोकळा झाला. पण, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुलला दुखापत झाली होती. त्याची दुखापत गंभीर नसली तरी त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी पंत सलामीला येऊ शकतो आणि चौथ्या क्रमांकावर जडेजा खेळू शकतो. किंवा महेंद्रसिंग धोनीला चौथ्या क्रमांकावर बढती मिळू शकते. 

असा असेल संघ

रोहित शर्मा, लोकेश राहुल/रिषभ पंत, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतीय क्रिकेट संघ