Join us

विंडीजविरुद्ध सराव सामन्यासाठी नायर कर्णधार

भारत दौऱ्यावर येणा-या वेस्ट इंडीजविरुद्ध होणा-या दोन दिवसीय सराव सामन्यासाठी बोर्ड एकादश संघ जाहीर झाला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:08 IST

Open in App

नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर येणा-या वेस्ट इंडीजविरुद्ध होणा-या दोन दिवसीय सराव सामन्यासाठी बोर्ड एकादश संघ जाहीर झाला आहे. बडोदा येथे २९ सप्टेंबरपासून होणा-या या सामन्यात करुण नायरकडे बोर्ड एकादश संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले. बीसीसीआयच्या निवड समितीने या सामन्यासाठी १३ खेळाडूंची निवड केली आहे. त्यात जबरदस्त सूर गवसलेला मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा हनुमा विहारी आणि अंकित बावणे याच्यासह अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना राजकोट येथे ४ ते ८ आॅक्टोबरला खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना हैदराबाद येथे १२ ते १६ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ