Video : १९ चेंडूंत कुटल्या ९२ धावा! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नोंदवलं गेलं सर्वात वेगवान शतक 

तिरंगी मालिकेतील नामिबिया विरुद्ध नेपाळ या पहिल्या सामन्यात हा विश्वविक्रम नोंदवला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 01:02 PM2024-02-27T13:02:06+5:302024-02-27T13:02:24+5:30

whatsapp join usJoin us
Namibia's Jan Nicol Loftie-Eaton now has the FASTEST hundred in T20I history, He scores 33-ball hundred against Nepal today | Video : १९ चेंडूंत कुटल्या ९२ धावा! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नोंदवलं गेलं सर्वात वेगवान शतक 

Video : १९ चेंडूंत कुटल्या ९२ धावा! आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त नोंदवलं गेलं सर्वात वेगवान शतक 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

FASTEST hundred in T20I history ( Marathi News )  - आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये आज सर्वात वेगवान शतकाची नोंद झाली. तिरंगी मालिकेतील नामिबिया विरुद्ध नेपाळ या पहिल्या सामन्यात हा विश्वविक्रम नोंदवला गेला. नामिबायाने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २०६ धावा केल्या आहेत आणि यात जॅन निकोल लॉफ्टी-एटन ( Jan Nicol Loftie-Eaton ) याने वेगवान शतकाची नोंद केली. त्याने ३३ चेंडूंत शतक झळकावताना नेपाळच्या कुशल मल्ला ( ३४ चेंडू) याचा विक्रम मोडला.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या नामिबियाला मिचेल व्हॅन लिंगेन ( २०) व मलान क्रुगर ( ५९) यांनी चांगली सुरुवात करून दिली. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील फलंदाज अपयशी ठरले. पण, मलान व लॉफ्टी-एटन यांनी दमदार खेळ केली. लॉफ्टी-एटनने ३६ चेंडूंत १०१ धावा चोपल्या. त्याने ३३ चेंडूंत शतक पूर्ण केले. ११ चौकार व ८ षटकारांसह त्याने १९ चेंडूंत ९२ धावा कुटल्या. मलान ४८ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५९ धावांवर नाबाद राहिला. 

ट्वेंटी-२०तील वेगवान शतकवीर 
कुशल मल्ला - ३४ चेंडू ( नेपाळ विरुद्ध मंगोलिया, २०२३) 
डेव्हिड मिलर - ३५ चेंडू ( दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, २०१७ ) 
रोहित शर्मा - ३५ चेंडू (  भारत विरुद्ध श्रीलंका, २०१७) 
एस विक्रमसेकरा     - ३५ चेंडू ( झेक प्रजासत्ताक विरुद्ध तुर्की, २०१९) 
एस पेरियालवार - ३९ चेंडू ( रोमानिया विरुद्ध तुर्की, २०१९)   

Web Title: Namibia's Jan Nicol Loftie-Eaton now has the FASTEST hundred in T20I history, He scores 33-ball hundred against Nepal today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.