Join us  

टीम इंडियाच्या जर्सीवर झळकणार 'या' भारतीय कंपनीचे नाव

विश्वचषकानंतर भारतीय संघात आधीच बदलाचे वारे सुरु असतानाच आणखी एका बदलासह भारत संघ मैदानात उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 10:26 AM

Open in App

मुंबई -  विश्वचषकानंतर भारतीय संघात आधीच बदलाचे वारे सुरु असतानाच आणखी एका बदलासह भारत संघ मैदानात उतरणार आहे. गेल्या दोन वर्षापासून भारतीय संघाच्या जर्सीवर ओप्पो या चिनी कंपनीचे नाव असायाचे. मात्र हे बदलून आता BYJU'S या भारतीय कंपनीचे नाव जर्सीवर झळकणार आहे. गेल्या दोन वर्षापासून भारतीय संघाच्या जर्सीवर ओप्पो या चिनी कंपनीचे नाव असायाचे. मात्र हे बदलून आता BYJU'S या भारतीय कंपनीचे नाव जर्सीवर झळकणार असल्याचे समजते. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, ओप्पो कंपनीने याबाबत सांगितले की, या हक्कांसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पैसे खर्च केले आहेत याची आम्हाला जाणीव झाली आहे. त्यामुळे आम्ही हा हक्क अर्धवट सोडत आहोत. परंतु बीसीसीआयला याचे कोणतेही नुकसान होणार नाही. कारण हक्कांसंबंधातील उर्वरित रक्कम आता BYJU'S कंपनी कढून घेतली जाईल.  

भारताचा वेस्ट इंडिज दौरा झाल्यानंतर जर्सीवरील ओप्पोचे नाव काढले जाईल. या चिनी कंपनीला पाच वर्षांसाठी 1079 कोटी रुपयांच्या मोबदल्यात मार्च 2017 मध्ये हक्क मिळाले होते. परंतु कंपनीने अडीच वर्षे आधीच हक्क सोडण्याचे ठरविले आहे. बीसीसीआयने यासाठी कोणत्याही लिलाव प्रक्रियेची सुरूवात केली नाही. परंतु ओप्पोने स्वत:च हे अधिकार BYJU'S या भारतीय कंपनीला दिला आहे.

टॅग्स :भारतओप्पो