Join us

Mystery girl DC vs KKR IPL 2022 : Rishabh Pant ने डाईव्ह मारली, पण 'ही' तरुणी व्हायरल झाली; सोशल मीडियावर तिने हवा केली, पाहा फोटो 

दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ १७१ धावांत तंबूत परतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 20:57 IST

Open in App

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders, IPL 2022 Live updates : पृथ्वी शॉ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अर्धशतकी खेळीनंतर कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) व खलिल अहमद यांनी गोलंदाजीत कमाल दाखवताना दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवून दिला. दिल्लीने विजयासाठी ठेवलेल्या २१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ १७१ धावांत तंबूत परतला. पण, आयपीएल म्हटले की ग्लॅमरचा तडका आलाच,  त्यामुळे खेळाडूंची कामगिरी सोडून एका मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली. रिषभ पंतने डाईव्ह मारल्यानंतर कॅमेरामनने या तरुणीच्या रिअॅक्शनवर कॅमेरा टिपला अन् इथे तिला पाहणाऱ्या सर्वांच्या काळजाचा ठोका चूकला.

सलामीवीर पृथ्वी शॉ ( ५१) व डेव्हिड वॉर्नर ( ६१)  यांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करताना मजबूत पाया रचला.  कर्णधार रिषभ पंत ( २७), अक्षर पटेल ( २२*) व शार्दूल ठाकूर ( २९*) यांनीही योगदान दिले. कोलकाताच्या सुनील नरीनने दोन विकेट्स घेतल्या. दिल्ली कॅपिटल्सने ५ बाद २१५ धावांचा डोंगर उभा केला. लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणेला जीवदान मिळूनही फार मोठी खेळी करचा आली नाही. श्रेयस अय्यर ( ५४) व नितीश राणा ( ३०) यांच्यानंतर आंद्रे रसेल ( २४) कोलकाताच्या विजयासाठी संघर्ष करताना दिसला. पण, खलिलने २५ धावांत ३ विकेट्स व कुलदीपने ३५ धावांत ४ विकेट्स घेत त्यांचा पराभव पक्का केला. शार्दूलने २ विकेट्स घेतल्या.  

पाहा व्हिडीओ...

 

टॅग्स :आयपीएल २०२२दिल्ली कॅपिटल्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App