Join us

महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघातील खेळाडूवर संकट; सामन्यानंतर मिळाली त्याला व पत्नीला जीवे मारण्याची धमकी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 13:06 IST

Open in App

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करतो. त्याच्या संघातील प्रमुख खेळाडू व दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिल ( Faf du Plessis) यानं त्याच्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक क्षण सांगितला. त्याला व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आफ्रिकेला न्यूझीलंडकडून ४९ धावांनी पराभव पत्करावा लागला. २२२ धावांचा पाठलाग करताना ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखाली खेळणारा आफ्रिकेचा संघ १७२ धावांवर गडगडला. शेर ए बांगला नॅशनल स्टेडियमवर हा सामना झाला होता. त्यात फॅफनं ४३ चेंडूंत ३६ धावांची खेळी केली होती, परंतु त्याची ही खेळी संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही. त्यानंतर फॅफ व त्याच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

''सामन्यानंतर मला व पत्नीला सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली गेली. तो मॅसेज पाहून आम्ही दोघंही घाबरलो होतो. काय करावं हेच सूचत नव्हतो. यात अशा काही धमक्या होत्या, ज्या मी सांगूही शकत नाही. अशा घटनांनंतर तुम्ही लोकांप्रती अंतर्मुख होता आणि स्वतःभवती एक ढाल तयार करता. सर्व खेळाडूंना यातून जावं लागतं,''असे फॅफनं सांगितले होते.  

त्या सामन्यात आफ्रिकेच्या २७.४ षटकांत ४ बाद १२१ धावा झाल्या होत्या. नॅथन मॅकक्युलनम जेपी ड्युमिनिला बाद केले आणि फॅफ फलंदाजीला आला. एबी डिव्हिलियर्स ३५ धावांवर धावबाद झाला अन् आफ्रिकेची अवस्था ३७.४ षटकांत ८ बाद १४६ अशी झाली. ४३व्या षटकात फॅफ बाद झाला अन् किवींना शेपूट गुंडाळण्यात वेळ लागला नाही.    

टॅग्स :एफ ड्यु प्लेसीसद. आफ्रिकान्यूझीलंड