Join us

टी-२० विश्वचषकासाठी माझी निवड शक्य नाही - उमेश यादव

धोनीला वाटत असेल तर तो निश्चित खेळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 00:30 IST

Open in App

नवी दिल्ली : आगामी आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात आपली निवड होणार नाही, असे भारताच्या कसोटी संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याने बुधवारी स्पष्ट केले.

‘स्पोर्ट्स कीडा’ या संकेतस्थळाशी संवाद साधताना उमेशने टी-२० विश्वचषकासाठी स्वत:च्या पसंतीचा भारतीय संघ निवडला आहे. त्यात महेद्रसिंग धोनीच्या नावाला पसंती दिली. माही स्वत: खेळणार नसेल तर मात्र ऋषभ पंत खेळेल, असे उमेशने म्हटले आहे. कोरोनामुळे जगभरातील क्रीडा विश्वाला बसला आहे. बीसीसीयने आपल्या सर्व महत्त्वाच्या स्पर्धांसोबत आयपीएलचे १३ वे सत्रदेखील पुढे ढकलले. आॅस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे संपूर्ण क्रीडाविश्व लॉकडाऊन आहे. यामुळे टी-२० विश्वचषकाच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सध्या अनेक भारतीय खेळाडू सोशल मीडियावर संवाद साधत क्रिकेटचा माहोल कायम ठेवत आहेत. उमेशने आगामी टी-२० विश्वचषकासाठी स्वत:च्या पसंतीचा संघ जाहीर केला.

‘आपण टी-२० विश्वचषकासाठीच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले. फिरकीपटू म्हणून कुलदीप आणि युजवेंद्र चहलची संघात निवड होईल. बुमराह आणि भुवनेश्वर हे दोन जलदगती गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवतील. तिसºया गोलंदाजासाठी दीपक चहर आणि मोहम्मद शमी यांच्यात स्पर्धा असेल. मी या शर्यतीत नाही,’असे उमेश यादवने स्पष्ट केले. ‘धोनी इज बॅक’ व्हिडिओ व्हायरलचेन्नई : महेंद्रसिंग धोनी सध्या रांचीतल्या फार्महाऊसवर क्वारंटाईन झाला आहे. धोनीची पत्नी साक्षीने काही दिवसांपूर्वी रांचीतल्या फार्महाऊसचे फोटो सोशल मीडियावर टाकले होते. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात धोनीची मुलगी जीवा हिला कंटाळा आल्यामुळे धोनीने तिला आपली बाईक काढत फार्महाऊसची सफर घडवली. तो अनेक महिने क्रिकेटपासून दूर असला, तरी त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. धोनीला पुन्हा एकदा खेळताना पाहायची अनेकांची इच्छा आहे. साक्षी धोनी हिने एक झकास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता चेन्नई सुपरकिंग्सने एक झकास व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये धोनी मुलगी जीवा आणि कुत्रा यांच्यासोबत चेंडूने खेळताना दिसतो आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ‘धोनी इज बॅक’ असे लिहिण्यात आले आहे.विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एकही सामना न खेळलेला यष्टिरक्षक- फलंदाज महेद्रसिंग धोनी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात पुनरागमन करेल काय, याबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. याविषयी उमेशला विचारताच तो म्हणाला, ‘या प्रश्नाचे उत्तर तो स्वत: देऊ शकतो. माहीला वाटत असेल तर तो स्वत: संघात स्थान मिळवू शकतो. धोनी खेळणार नसेल तर ऋषभ पंत याची निवड होईल.’ अनेक दिग्गजांच्या मते, धोनीचे संघात पुनरागमन कठीण झाले आहे. निवृत्तीसंदर्भात मात्र धोनीने अद्याप कुठले वक्तव्य केलेले नाही. यामुळेच तो टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी प्रयत्न करणार, असा अर्थ काढला जात आहे. ३८ वर्षांच्या धोनीकडे ९० कसोटी, ३५० वन डे आणि ९८ टी-२० सामने खेळण्याचा भक्कम अनुभव आहे. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी