Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mustafizur Rahman: आयपीएलमधून बाहेर झालेल्या मुस्तफिजूर रहमानला ९.२० कोटी मिळतील का? जाणून घ्या नियम!

Mustafizur Rahman News: आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला संघाबाहेर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 14:14 IST

Open in App

आयपीएल २०२६ च्या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला संघाबाहेर केले. बीसीसीआयच्या सूचनेनंतर केकेआरने हा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये केकेआरने मुस्तफिजूरवर लावलेले ९.२० कोटी रुपये त्याला मिळतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

आयपीएलमध्ये खेळाडूंच्या पगाराचा विमा उतरवलेला असतो. साधारणपणे, जर एखादा खेळाडू सराव शिबिरात किंवा स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाला, तर त्याला विम्याद्वारे ५० टक्क्यांपर्यंत मानधन मिळते. परंतु, मुस्तफिजूरच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. त्याला दुखापतीमुळे नव्हे तर, राजकीय आणि प्रशासकीय कारणांमुळे बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे केकेआर त्याला कोणतीही रक्कम देण्यास कायदेशीररित्या बांधील नाही.

बीसीसीआयने मुस्तफिजूरला बाहेर काढण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हे स्पष्ट केलेले नाही. भारत-बांगलादेशमधील सध्याचे अस्थिर राजकीय वातावरण आणि बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे समजते. बीसीसीआयच्या या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड संतप्त झाले आहे. त्यांनी याला प्रत्युत्तर म्हणून टी-२० विश्वचषक सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली. खेळाडूची कोणतीही चूक नसताना त्याचे आर्थिक नुकसान करणे,  हे खेळाडूंच्या हक्कांचे उल्लंघन असल्याचे बांगलादेशचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mustafizur Rahman's IPL Exit: Will he get ₹9.20 Crore?

Web Summary : Kolkata Knight Riders dropped Mustafizur Rahman before IPL 2026. Due to political reasons, he might not receive his ₹9.20 crore contract. BCCI's decision angered Bangladesh Cricket Board, who demand T20 World Cup relocation.
टॅग्स :आयपीएल २०२६कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल लिलाव 2026