ढाका : मुशफिकूर रहीमच्या आठव्या शतकी खेळीच्या बळावर बांगलादेशने पावसाच्या व्यत्ययात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा डकवर्थ- लुईस नियमाच्या आधारे १०३ धावांनी पराभव करीत बांगलादेशने पहिल्यांदा वन डे मालिका जिंकली.
बांगलादेशच्या डावात पावसाचा दोनदा व्यत्यय आला. रहीमने १२७ चेंडूत १० चौकारांसह १२५ धावा केल्या. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करीत ४८.१ षटकात १४६ अशी मजल गाठली तर विजयी लक्ष्य गाठणाऱ्या लंकेची ३८ षटकात ९ बाद १२६ अशी पडझड झाली. त्यातच पावसाने हजेरी लावताच डकवर्थ-लुईस नियमानुसार लंकेला ४० षटकात २४५ धावांचे लक्ष्य देण्यात आले. याचा अर्थ अखेरच्या दोन षटकात त्यांना ११९ धावा करायच्या होत्या. लंकेचा डाव ९ बाद १४१ धावांवर थांबला. लंकेविरुद्ध क्रिकेटच्या सर्व प्रकारात बांगलादेशचा हा पहिला विजय आहे. रविवारच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने ३३ धावांनी बाजी मारली होती. तिसरा आणि अखेरचा सामना शुक्रवारी खेळला जाईल.