Ranji Trophy Final : १९ वर्षीय मुशीर खानची सेंच्युरी; श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणेला शतकाने दिली हुलकावणी 

मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:13 PM2024-03-12T14:13:45+5:302024-03-12T14:14:59+5:30

whatsapp join usJoin us
Musheer Khan completed Hundred in Ranji Trophy Final 2024, Shreyas Iyer ( 95)& Ajinkya Rahane ( 73) scored missed century against Vidharbha, Mumbai 332/4, Lead By 451 Runs | Ranji Trophy Final : १९ वर्षीय मुशीर खानची सेंच्युरी; श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणेला शतकाने दिली हुलकावणी 

Ranji Trophy Final : १९ वर्षीय मुशीर खानची सेंच्युरी; श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणेला शतकाने दिली हुलकावणी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ranji Trophy Final 2024 - मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या फायनलमध्ये विदर्भ संघाविरुद्ध वर्चस्व गाजवले आहे. १९ वर्षीय मुशीर खान याने पुन्हा एकदा शतकी खेळी करून मुंबईला मोठी आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. फॉर्माशी झगडणारा श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि  अजिंक्य रहाणे ( ७३) यांना शतकापासून वंचित रहावे लागले. फायनल पाहण्यासाठी वानखेडेवर महान फलंदाज सचिन तेंडुलकर व टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होते. 


मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. धवल कुलकर्णी, शाम्स मुलानी व तनुष कोटियन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात पृथ्वी शॉ ( ११) व भुपेन लालवानी ( १८) ही सलामीची जोडी अपयशी ठरली. त्यानंतर कर्णधार अजिंक्यने युवा फलंदाज मुशीरला सोबत घेऊन १३० धावांची भागीदारी केली. अजिंक्य १४३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७३ धावांवर बाद झाला.


मुशीरने शतक पूर्ण करताना श्रेयस अय्यरसह आक्रमक खेळ केला आणि या दोघांची चौथ्या विकेटसाठी १६८ धावा जोडल्या. फॉर्माशी संघर्ष करणारा श्रेयस आज वन डे स्टाईल फटकेबाजी करत होता. अर्धशतकानंतर त्याची पाठ पुन्हा दुखल्याचे पाहायला मिळाले. प्राथमिक उपचार घेऊन तो मैदानावर उभा राहिला, परंतु शतकाच्या उंबरठ्यावरून त्याला माघारी जावे लागले. त्याने १११ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९५ धावा केल्या. मुशीर १३० धावांवर खेळतोय आणि मुंबईने ४ बाद ३३५ धावा करून ४५४ धावांची आघाडी घेतली आहे. 

 

Web Title: Musheer Khan completed Hundred in Ranji Trophy Final 2024, Shreyas Iyer ( 95)& Ajinkya Rahane ( 73) scored missed century against Vidharbha, Mumbai 332/4, Lead By 451 Runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.