Join us  

Murali Vijay Dinesh Karthik Video: मुरली विजयसमोर दिनेश कार्तिकच्या नावाचा जयघोष; Live मॅचमध्ये जोडावे लागले हात

अखेर मुरली विजयला प्रेक्षकांना हात जोडून चिडवणं थांबवायला सांगावं लागलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 5:34 PM

Open in App

Murali Vijay Dinesh Karthik Video: टीम इंडियाचा एकेकाळचा टेस्ट स्पेशालिस्ट मुरली विजय हा सध्या भारतीय संघाच्या स्पर्धेतून पूर्णपणे बाहेर झाला असला तरी क्रिकेटच्या मैदानावर अजूनही आपली चमक दाखवत आहे. मुरली विजयने दीर्घ काळानंतर तामिळनाडू प्रिमियर लीग स्पर्धेतून पुनरागमन केलं आणि दमदार शतक ठोकलं. पण इतकी दमदार कामगिरी केल्यानंतरही मुरली विजयला चाहत्यांच्या समोर हात जोडावे लागले. त्याचं कारण होतं मुरली विजयच्या वैयक्तिक आयुष्यातील एक गोष्ट. त्यावरून प्रेक्षकांनी त्याला सातत्याने चिडवल्यामुळे अखेर त्याला प्रेक्षकांना हात जोडून चिडवणं थांबवायला सांगावं लागलं.

मुरली विजयच्या समोर झाला दिनेश कार्तिकच्या नावाचा जयघोष

मुरली विजय टीएनपीएल मध्ये खेळत असताना त्याच्या समोर सातत्याने डीके-डीके असं प्रेक्षकांनी जयघोष केला. त्यानंतर मुरली विजय काहीसा ओशाळला. त्याने चक्क फॅन्ससमोर हात जोडले आणि जयघोष थांबवण्याची विनंती केली. मुरली विजयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मुरली विजय सामन्यात सीमारेषेवर फिल्डिंग करत होता. याच दरम्यान प्रेक्षकांनी डीके-डीके ओरडायला सुरूवात केली. त्यानंतर मुरली विजयने हात जोडत हे सारं थांबवायला सांगितले. पाहा व्हिडीओ-

दिनेश कार्तिकच्या नावाच्या वेळी मुरली विजय का ओशाळला?

मुरली विजय मैदानात असताना फॅन्स डीके-डीके का ओरडत होते आणि मुरली विजयनेही हात का जोडले? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचं एक खास कारण आहे. मुरली विजय याची पत्नी निकिता विजय ही दिनेश कार्तिकची पहिली पत्नी आहे. मुरली विजयसोबत निकीता हिची जवळीक वाढू लागल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर दिनेश कार्तिकने तिला घटस्फोट दिला होता. त्यानंतर दिनेश कार्तिकने भारतीय स्क्वाशपटू दिपिका पल्लिकलशी लग्न केलं. तर मुरली विजयने निकीता विजय हिच्याशी लग्नगाठ बांधली.

टॅग्स :सोशल मीडियामुरली विजयदिनेश कार्तिकसोशल व्हायरल
Open in App