Join us

मुंबईचा पराभव म्हणजे ‘केवळ दोन चेंडूंची कथा’

ही तीन षटकांची म्हणा किंवा मग दोन चेंडूंचीच कहाणी समजा... दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सबाबत असेच घडले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:46 IST

Open in App

हर्षा भोगले लिहितात...ही तीन षटकांची म्हणा किंवा मग दोन चेंडूंचीच कहाणी समजा... दुसऱ्या शब्दात सांगायचे तर यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सबाबत असेच घडले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबईने चौथ्या, दहाव्या आणि विसाव्या षटकांत एकूण ६६ धावा बहाल केल्या. त्यात दोन नोबॉल. त्यावर निघाल्या १४ धावा. दोन्ही संघात हाच मोठा फरक ठरला. अखेरचे षटक सुरू झाले तेव्हा उभय संघाची धावसंख्या तशी बरोबरीत होती.ही आकडेवारी सादर करण्यामागील हेतू हाच कीलहान लहान चुका सामन्याला कलाटणी देऊ शकतात, शिवाय एखाद्या संघाला स्पर्धेबाहेरही फेकू शकतात. मुंबई इंडियन्सला तीनदा जेतेपदाचा अनुभव असेलही. पण संघ व्यवस्थापक अद्याप जेतेपदाबद्दल विचार करीत असेल तर मला आश्चर्य वाटेल.याचे उत्तर कुणाकडे असेल असे मला वाटत नाही. तुम्ही थोड्या फरकाने सामना गमावत असाल किंवा लहान लहान गोष्टी तुम्हाला पराभवाकडे नेत असतील तरतुम्ही स्वत:ला दुर्दैवी म्हणाल का किंवा मग त्यामागे आणखी काही कारण आहे? तुम्ही स्वत:चे भाग्यस्वत: लिहिता की मग खराब करता,हा देखील प्रश्न आहे. विजेतासंघ स्वत:चे भाग्य स्वत: लिहितोअसे सांगतो तर पराभूत संघपरिस्थिती पालटेल, असा अशावाद व्यक्त करतो.मुंबई इंडियन्स या पर्वातील कामगिरीचे मूल्यमापन कसे करतो, हे पाहण्यासारखे असेल. माझे स्वत:चे मत असे की, काही गोष्टींवर तुमचे नियंत्रण नसेलही पण नोबॉल, झेल सोडणे, डायरेक्ट हिट या गोष्टी तुमच्या तयारीवर तसेच समर्पित वृत्तीवर अवलंबून असतात.या सर्व बाबी टी-२० प्रकारात मोलाच्या ठरतात. या प्रकारात तर एक चेंडूदेखील सामन्याचे चित्र पालटू शकतो. मुंबई इंडियन्सने स्वत:च्या अवस्थेकडे इतिहास बनविण्याच्या संधीच्या रूपात पाहायला हवे. पण हे बोलायला सोपे जरी असले तरी प्रत्यक्षात साकार करणे तितकेच कठीण आहे.(टीसीएम)

टॅग्स :आयपीएल 2018मुंबई इंडियन्स